मुंबई | 8 मे 2025 – भारताने 6-7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9
दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले.
या कारवाईनंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून त्याचा परिणाम थेट
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर झाला आहे. भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांचा कल
सुरक्षित गुंतवणुकीकडे वळला असून, सोन्याच्या किमती पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठत आहेत.
गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत तब्बल 5,000 रुपयांची वाढ झाली असून,
24 कॅरेट सोनं 100711 रुपये प्रति तोळा या पातळीवर पोहोचले आहे.
गुरुवारी सकाळीच याचे दर 101110 रुपये पर्यंत पोहोचले. 23, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दरही झपाट्याने वाढले असून,
याचा सर्वसामान्य ग्राहकांवर विशेषतः लग्नसराईत मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, बाजारातील जाणकारांचा अंदाज आहे की या वर्षाच्या शेवटी सोन्याचे दर
1.20 लाख रुपये प्रति तोळा पर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या चढत्या दरात मोठी खरेदी करू नये,
असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देत आहेत.
दरम्यान, जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय
बाजारात सोन्याच्या किमती स्थिर आहेत. मात्र, भारतातील भू-राजकीय घडामोडी आणि धार्मिक
सणांच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत.
चांदीचे दरही यामध्ये मागे नाहीत. 999 शुद्धतेच्या चांदीचे दर 97587 रुपये असून,
जीएसटीसह चांदीचे दर 95045 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अशा स्थितीत ग्राहकांनी सध्या खरेदी टाळावी
आणि बाजार स्थिर होईपर्यंत प्रतीक्षा करावी, असे मत सराफा व्यवसायिक व्यक्त करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoorvar-jatik-patham/