अकोट : स्थानिक सेंट पॉल्स अकॅडमी, अकोट येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष नवनीत लखोटिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष लुनकरण डागा, सचिव प्रमोद चांडक, दीपम लखोटिया उपस्थित होते. याशिवाय शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल, व्यवस्थापक प्रभुदास नाथे, पर्यवेक्षक अभिजीत मेंढे, सारिका रेळे, मालती महल्ले, वैशाली गावत्रे तसेच विज्ञान शिक्षक शुभम कळसकर आणि जयश्री हिंगणकर यांची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आणि महान भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर मुकेश कहार यांनी विज्ञान दिवसाच्या निमित्ताने प्रास्ताविक केले. त्यांनी विज्ञानाचे महत्त्व, वैज्ञानिक विचारसरणीची गरज आणि विद्यार्थ्यांनी संशोधनाची वृत्ती जोपासण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले.
Related News
दुर्गुणांच्या होळीचा संकल्प; जय बजरंग विद्यालय चान्नी येथे स्काऊट-गाईडचा अनोखा उपक्रम
‘इको-फ्रेंडली’ होळी आणि ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ निधी संकलन उपक्रम उत्साहात संपन्न
सेंट पॉल्स अकॅडमी अकोटमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
अकोट – विद्यांचल द स्कूलमध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षणाच्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा
अकोट : रोटरी क्लबच्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ८०४ रुग्णांची तपासणी
शिवपूर येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
अकोट–अकोला मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य ; संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला
स्व. गुलाबरावजी बांबल विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाचे महत्त्व कार्यक्रम
लोहारी खुर्द येथे त्रिदिवसीय प्रजासत्ताक सोहळा उत्साहात संपन्न
सम्यक संबोधीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
यानंतर विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धेला सुरुवात झाली. इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर आपले विचार मांडले. स्वरा वनकर आणि श्रेयश येवुल यांनी महान शास्त्रज्ञांच्या कार्याची माहिती सांगत त्यांच्या संशोधनाचा समाजावर झालेला प्रभाव स्पष्ट केला. तसेच उन्नती साबळे, सियारा पळसपगार, मंदार थोरात, विराग उगले, शर्वरी हरणे आणि ईश्वरी साबळे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व आणि विज्ञानामुळे मानवाच्या जीवनात झालेल्या प्रगतीबद्दल प्रभावी भाषणे केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित संकल्पना आणि प्रयोग यांचे आकर्षक चित्रांद्वारे सादरीकरण केले. तर इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक प्रश्नांची उत्तरे देत आपले ज्ञान प्रदर्शित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक विजय बिहाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो यामागील इतिहास स्पष्ट केला आणि भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण प्रभाव’ या महत्त्वपूर्ण शोधाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास केवळ पुस्तकापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी विज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाविका लोणकर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैभवी तायडे, दिप्ती अग्रवाल, मयुरी हुतके, सोनल गांधी, सृष्टी देशमुख, शिल्पा ठाकूर, विनिता हाडोळे, प्रतीक्षा काळे, ज्ञानेश्वरी बोंद्रे, ऐश्वर्या चौधरकर, दीक्षिता चोपडे, अगस्ती ठाकूर, प्रणव देंडव तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.
