अकोट – सेंट पॉल्स अकॅडमी अकोट येथे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष नवनीत लखोटिया होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष लुनकरण डागा, सचिव प्रमोद चांडक, दीपम लखोटिया, शारदा लखोटिया, सुधा डागा आणि रेखा चांडक उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल, व्यवस्थापक प्रभुदास नाथे, पर्यवेक्षक अभिजीत मेंढे, सारिका रेळे, मालती महल्ले आणि वैशाली गावत्रे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्व मराठी विषय शिक्षिकाही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमापूजनाने आणि दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर वर्ग सातवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले, ज्याला डॉ. अर्चना रायबोले आणि योगेश चेडे यांनी साथ दिली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच सर्व मराठी विषय शिक्षकांचा गौरवही पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. शिक्षिका सुमती वानखडे यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर विद्यार्थिनींनी मराठी भाषेचे गौरवगीत सादर केले. शिक्षक पल्लवी ढगे यांनी कविता सादर केली आणि नंतर वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त इयत्ता पहिली, दुसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली. वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरणावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न असलेली लेखी स्पर्धा घेण्यात आली, तर वर्ग तिसरी, चौथी व सातवीसाठी एक मिनिट वक्तृत्व स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.
Related News
कवितेच्या नव्या वाटेवर ‘काजळकाठ’चा प्रभाव; साहित्यविश्वातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त दाद
मराठी साहित्यविश्वात गेल्या काही वर्षांत अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले. मात्र त्यामध्ये ...
Continue reading
महान (प्रतिनिधी: अनिस शेख) – पीएम श्री केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात शाळांच्या शिक्षकांसाठी आयोजित शासकीय अभ्यास दौऱ्याचा उत्साहवर्धक कार्यक्रम गुजरातमध्ये सुरू झाला...
Continue reading
अकोट : स्थानिक सेंट पॉल्स अकॅडमी, अकोट येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे आणि वैज्ञ...
Continue reading
लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे निर्माता अशोक हांडे यांना मुंबईतील माटुंगा परिसरातील त्यांच्या कार्यालयात पार्किंगविरोधी वादातून मारहाण झाली आहे. ही घटना १ म...
Continue reading
आज, २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा दिवस मराठी भाषेचा अभिमान आणि समृद्ध परंपरा जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मान...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी : एकात्मिक समाज शिक्षण प्रसारक मंडळ गांधीग्राम द्वारा संचालित श्री शंकर विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शनिवार, दि. १४ फेब्रुवारी ...
Continue reading
हिवरखेडमध्ये २६ जानेवारीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व कर...
Continue reading
अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित त्रिदिवसीय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत व जि...
Continue reading
“स्पंदन” काव्यसंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा
अकोला : सौ.वंदना सतिश तिडके यांच्या लेखणीतून साकारलेल्या “स्पंदन” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी अक...
Continue reading
Basant Panchami 2026 : तारीख, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि सणासाठी ६ सोप्या पारंपरिक पाककृती
Basant Panchami हा भारतातील एक अत्यंत आनंददायी, रंगीबेरंगी आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्...
Continue reading
अकोट येथील गुरुमाऊली प्राथमिक मराठी शाळा, साने गुरुजी प्राथमिक मराठी शाळा आणि मीनाक्षी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठ्या उत...
Continue reading
अकोट – श्रीजी कॉलनी येथील सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात पाहु...
Continue reading
मुख्याध्यापक विजय बिहाडे यांनी भाषणात मराठी भाषेची महत्ता सांगितली व विद्यार्थ्यांना मराठी पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा कुलकर्णी व रोहिणी कोकाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वनिता थोरात व दिपाली कुलट यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता सोनो, अर्चना वनवे, अभिलाष निचळ, अभिलाष काळमेघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सर्व उपस्थितांनी मराठी भाषेप्रती आपले प्रेम व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना भाषेचा गौरव अनुभवता आला.
read also : https://ajinkyabharat.com/murtijapurchya-junya-holi-rangpanchamichya-memories/