अकोट येथील टाकपुरा येथील मारुती संस्थानच्या सभागृहात रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या संयुक्त प्रयत्नाने भव्य प्रमाणावर मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे वितरण संपन्न झाले. नगर परिषद अकोटच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. नयना विशाल इंगोले, डॉक्टर विशाल इंगोले व नगरसेवक स्नेहल दाभेराव यांच्या उपस्थितीत ही सामाजिक उपक्रमाची सुरुवात झाली.
शिबिरामध्ये एकूण ८०४ रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ५१२ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील सर्व धर्म, वयोगटातील नागरिकांनी लाभ घेतला. शिवाय, तपासणीदरम्यान १५० रुग्णांना पुढील मोतीबिंदू तपासणीसाठी रोटरी आय हॉस्पिटलकडे पाठवले गेले. रोटरी आय हॉस्पिटलकडून डॉक्टर अनिल चेडे व ऑप्टोमेट्रीस्ट ज्ञानेश्वर इखार यांनी शिबिरात आपली सेवा दिली.
सदर शिबिराचे उद्घाटन रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत झाले. उद्घाटनकार्यक्रमात डॉक्टर विशाल इंगोले, प्रभाकर मानकर, नगराध्यक्षा सौ. मायाताई धुळे, उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी पवार व चंचल पितांबरवाले यांनी धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी किशोर जुनघरे, पोलीस निरीक्षक ग्रामीण तसेच नगरसेवक अमोल पालेकर, मंगेश लोणकर, रवी ठाकूर, बादल अहिर, निलेश नवघरे, इम्रान खान, मनोज चंदन, जितेश बरेठीया हे सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते.
Related News
रावणदहनाचा खर्च टाळून शेतकऱ्यांसाठी ₹५१ हजारांची मदत; निलेश देव मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
अकोल्यातून माणुसकीचा संदेश; रावणदहनाचा भव्य सोहळा रद्द करून शेतकरी मदत निधी संकलित, ज...
Continue reading
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 137व्या...
Continue reading
तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी दररोज या सोप्या सवयींचे करा पालन; जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स
आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जीवनशैलीत डोळ्यांच्या आरोग्याकडे...
Continue reading
अकोट शहरातील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे. शाळेच्या संरक्षक भिंती अनेक ठिकाणी पडल्याने परिसरात मोकाट जनावरे व्यसनाधीन ...
Continue reading
१०० कोटींच्या 'देऊळ बंद २'चा ऐतिहासिक चमत्कार! २०० शेतकरी विद्यार्थ्यांना मदत, ३ जणांच्या परदेशी वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या माकडाने मागील दहा दिवसांपासून धुमाकूळ घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. सुरुवातीला लीलाबाई रेखाते यांच्यावर हल्ला...
Continue reading
पावसाळ्यात डोळे कोरडे पडण्यामागील कारणे कोणती? स्क्रीन टाइम, एसीचा वापर आणि बदललेली जीवनशैली 'ड्राय आय'चा धोका कसा वाढवते? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले 7 प्रभावी उपाय.
7 प्रभा...
Continue reading
मुसळधार पावसातही 'आऊट ऑफ सिलेबस – पुस्तकांच्या पलीकडे'च्या विशेष शोला उत्स्फूर्त प्रतिसाद; पर्यावरण संवर्धनाचा दमदार संदेश
शो हाउसफुल : पुणे शहरात मुसळधार पावसाची संततधार सुरू असत...
Continue reading
'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येदलापूर शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. छाप्यात ती...
Continue reading
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष आणि अकोला जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणात अकोट सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्याय...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धारूर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी नवघन हरी सबाळ यांच्या म्हशीचा इलेक्ट्रिक पोलच्या तानाला (स्टे वायर) करंट लागल्याने जागी...
Continue reading
आकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागरातून श्री संत वासुदेव महाराज पालखीचे पंढरपूर वारीसाठी भव्य प्रस्थान झाले. हरिनाम, अभंग, दिंडी, पुष्पवृष्टी, वारकऱ्यांना विमा सुरक्षा आणि शहरभर झा...
Continue reading
शिबिराच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लबच्या सचिव डॉक्टर नावेश मोहता, रवी मुंडगावकर, चंदू अग्रवाल, सुरेश व्यवहारे, राजकुमार गांधी, संतोष इस्थापे, शिरीष पोटे, दीपक कतोरे, उद्धव गणगणे, विजु सेदानी तसेच रणजीत खेडकर, सुशील लोणकर, विनोद रेळे, अनुप मुंडगावकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. तर दिनेश मेनसे, मुकेश कहार, प्रवीण यादव, श्याम धुराटे, पप्पू कैसर, करण सोळंके, भूषण लिल्हारे, प्रतीक लिल्हारे, विपुल शेले, यश बेलोकार, बाबूसिंग खन्नाडे, सुशील लोणकर, श्रीपाद धर्माधिकारी, संदीप लोणकर, विशाल चौधरी यासारख्या युवकांनी अथक परिश्रम घेतले.
सदर शिबिरामुळे अकोट परिसरातील नागरिकांना मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्यांचा लाभ मिळाला असून, नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. रोटरी क्लब व ट्रस्टच्या या उपक्रमाने डोळ्यांच्या आरोग्याकडे लोकांचे लक्ष वेधले असून भविष्यात अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/5-reasons-why-sanju-samson-got-a-deal-in-playing-11-and-bharatla-will-get-the-benefit-of-victory-t20-world-cup-2026/