इंझोरीला चक्रीवादळाचा तडाका
इंझोरी : संध्याकाळी पाच वाजता अचानक इंझोरी गावाला सुसाट वाऱ्यासह चक्रीवादळ आल्याने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा,
मुंगसाजी महाराज विद्यालय, यासह गावातील अनेक घरावरील चक्रीवादळाने तीन पत्रे उडाल्याने
Related News
हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली चक्रीवादळाचा जोर एवढा होता की जिल्हा परिषद मराठी
शाळेवरील शाळेची भिंत सह टिन पत्री उडाली पडलेल्या भिंतीमुळे वर्गखोलीत असणारे डेक्स बेंच
तुटून पडले तर मुंगसाजी महाराज विद्यालय मधील स्वयंपाक घरावरील संपूर्ण टीन उडून गेलीत यासह
इंझोरी वाघोळा रस्त्यावरील अनेक झाडे कोलमडून पडली तर विद्युत पोलही पडली असल्याने गावातील
विद्युत पुरवठा खंडित झाला आहे रस्त्यावरील अनेक झाडे पडल्याने रस्ता संपूर्ण बंद झाला आहे .
अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा नुकसान आहे सध्या नुकसानाची आकडेवारी पूर्ण अद्याप मिळाली नाही झालेल्या
नुकसानाचे शासनाने त्वरित पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी असायला नागरिकांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-shahar-pisallelya-makdane-citizen-awesome-five-citizen-citizens-alert/
