अकोट
अकोट शहरातील मध्यवर्ती भागात सकाळपासून एक पिसाळलेल्या माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
या माकडाने कबुतरी मैदान ते नागमते हॉस्पिटल,गवळीपुरा परिसर ते शिवाजी शाळा परिसरापर्यंत हैदोस घातला
असून यामुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहे. या माकडाच्या हल्ल्यात पाच नागरिक जखमी झाले आहे.
Related News
त्यामध्ये महीमा पालेकर वय १२, देवंगणा विनोद वक्ते वय ५६,सुर्वणा गणेश कांगळे वय ३२ आणि पवन.
शिवरकार वय १५ यांचा समावेश आहे.जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याशिवाय,शालिनी अवि पालेकर यांच्या अंगावर वानराने उडी मारून त्यांना दुखापत केली आहे.
तसेच गादी कारखान्याजवळ एका मुस्लिम व्यक्तीवरही वानराने हल्ला केला.मात्र त्या व्यक्तीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर जितेन बरेठिया व अविनाश पालेकर यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साथला.
वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील राऊत यांनी या संदर्भात माहिती देताना”संध्याकाळ पर्यंत आवश्यक बंदोबस्त लावण्यात येईल
आणि माकडाला पकडण्याची कारवाई सुरू आहे असे सांगितले” दरम्यान अकोट
शहरात नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने सतर्क राहून उपाययोजना सुरू केल्या आहेत.
लवकरच या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्याची कारवाई चालू आहे.
कोणीही घाबरू नका असा विश्वास व्यक्त केला आहे.
