भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप ..
लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार
अनुप धोत्रे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आल आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
अकोट नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी दिलासादायक अभय योजना;
यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात
दाखल करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील
उमरदरी येथील मतदार गोपाल चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली आहे.
अनुप धोत्रे यांनी निवडणुकीत जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गांचा उपयोग
केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केलाये.
धोत्रे यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली एकूण खर्चाची 95 लाखांची मर्यादा
ओलांडल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेत केला आहे.
त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे म्हणणे आहे.
खासदार अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या
खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: 81 लाख 17 हजार 102 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे.
यासोबतच भाजपने त्यांच्यासाठी 6 लाख 55 हजार 830 रुपये
खर्च केल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे.
हा एकूण खर्च त्यांनी 87 ला 72 हजार 932 एवढा दाखवला आहे.
मात्र भाजपने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या
जाहिराती प्रसिद्ध केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.
धोत्रे यांनी ही माहिती निवडणूक विभागाला खर्चाच्या हिशोबात देणे आवश्यक होती.
परंतु त्यांनी तसे न करता ही माहिती लपवून निवडणुक आयोगाची दिशाभूल केली असून
त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे याचिकेमधून म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/freezer-in-the-mortuary-of-akolyati-government-hospital-closed/