मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 – नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू
मूर्तिजापूर प्रतिनिधी :
मुर्तिजापूर,नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व महत्त्वाच्या प्रवेशबिंदूंवर स्थिर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उडानपूल पॉईंट–दर्यापूर रोड या प्रमुख मार्गावर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर आज सकाळपासून वाहनांची तपासणी सुरू आहे.
Related News
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
‘तुम्ही साले… कसले बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?’; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप ऊर...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
७ दिवसांत माफी मागा, अन्यथा ५०० कोटींचा दावा! मातोश्रीबाहेरच स्वीकारली नोटीस; Satish Salian–आदित्य ठाकरे वाद चिघळला
Disha Salian मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकार...
Continue reading
एपस्टीन फाइल्स घडू नयेत म्हणून अमेरिकेला मोदी सरकारकडून खंडणी? संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप ...
Continue reading
श्वेता महाले यांनी संजय गायकवाडांना पुन्हा डिवचलं; व्हिडीओ शेअर करत घेतला चिमटा, बुलढाण्यातील राजकीय वाद आणखी वाढला
बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमदारांमधील राज...
Continue reading
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत संघर्ष; राष्ट्रवादीच्या मागणीने राजकीय समीकरणांना ट्विस्ट
पुणे : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आत...
Continue reading
एकनाथ शिंदेंचा मोबाइल विमानातच राहिला; मध्यरात्री पोलिसांची धावपळ, तासाभरात मिळाला फोन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यावरून परत...
Continue reading
शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
विधीमंडळातील संख्याबळाच्या चाचणीवर शिंदे गटाचा भर; ‘विवेकाधिकाराचा...
Continue reading
शिंदेंच्या वकिलाचे दोन मोठे युक्तिवाद; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती? आशिष शेलार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Patil यांच्या नेतृत्वाख...
Continue reading
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
तपासणीदरम्यान पोलिस कर्मचारी व उड्डाण पथकाचे अधिकारी मिळून विविध वाहनांची डिक्की, केबिन, बॅग्ज तसेच संशयास्पद वस्तूंची सखोल तपासणी करताना दिसले. निवडणूक काळात अवैध पैसे, दारू, मौल्यवान वस्तू किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची वाहतूक रोखणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे.
तपासणीची प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी माध्यम प्रतिनिधीही नाक्यावर उपस्थित होते. वाहनांची तपासणी, कागदपत्रांची चौकशी आणि संशयास्पद वस्तूंची पडताळणी यामध्ये पथक अत्यंत दक्षतेने काम करत आहे. मतदान प्रक्रियेवर कोणताही अनधिकृत प्रभाव पडू नये याकरिता पथक सदैव सतर्क आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,“तपासणीदरम्यान पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे आणि परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे. निवडणूक शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”