भाजपला मोठा धक्का! युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची ‘एकला चलो’ भूमिका ; अपक्ष उमेदवारीमुळे स्टेशन विभागात पक्षाचे गणित कोलमडणार?
मूर्तिजापूर : नगरपालिका निवडणुका जवळ आल्या असताना भाजपला मोठी गळती लागली आहे. गेली २२ वर्षे भाजपमध्ये कार्यरत राहून युवा मोर्चाची मजबूत बांधणी करणारे आणि संघटनात महत्त्वाची भूमिका बजावणारे राहुल पाटील यांनी पक्षाची साथ सोडली असून प्रभाग १२ ‘अ’ मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्टेशन विभागात भाजपच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
राहुल पाटील हे भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष असून युवकांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. संघटन उभारणी, पक्षविस्तार आणि युवकांना जोडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये त्यांची स्वतंत्र छाप निर्माण झाली होती.
Related News
अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठी अपडेट
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तिढा आता लवकरच ...
Continue reading
सोलापूरच्या राजकीय वातावरणात सध्या एक भावनिक आणि तितकाच चर्चेचा विषय ठरलेलं पत्र जोरदार व्हायरल होत आहे. शिवसेना (उबाठा) गटातील फायरब्रँड नेत्या आणि उपन...
Continue reading
संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. ...
Continue reading
बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते तसेच दमदार सूत्रसंचालक म्हणून ओळख असलेल्या शेखर सुमन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक क्षेत्रांमध्ये यश मि...
Continue reading
6 खासदारांच्या निर्णयामागील धक्कादायक सत्य : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणखी एका म...
Continue reading
महायुतीला मोठा धक्का! सांगली-साताऱ्यात तब्बल 100 मतांची फूट, धैर्यशील कदमांचा 301 मतांनी दमदार विजय
MLC Election Result 2026: महायुती जिंकली, पण 100 म...
Continue reading
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! 23 पैकी 20 आमदारांची हजेरी, 3 गैरहजर; मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असताना शिवसेना (ठाकर...
Continue reading
अमरावती विधान परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस उमेदवाराला 0 मत, प्रवीण पोटेंचा मोठा गौप्यस्फोट
अमरावती : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसं...
Continue reading
6 खासदारांनंतर 14 आमदारही शिंदेंसोबत जाणार असल्याच्या चर्चेने ठाकरे गटात खळबळ
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चर्चा सुरू झाल...
Continue reading
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओमराजे...
Continue reading
365 मतांनी दणदणीत विजय! राजेंद्र राऊतांचा मोहिते पाटलांवर घणाघात; '118 मतंही पडली नसती' असा जोरदार टोला
सोलापूर : सोलापूर विधान परिषद स्थानि...
Continue reading
पाटील परिवाराचा भाजपशी असलेला जवळचा संबंधही लक्षणीय आहे. मागील कार्यकाळात त्यांच्या पत्नी सौ. सरिता राहुल पाटील या भाजपच्या नगरसेविका म्हणून काम पाहत होत्या, तसेच त्या पक्षाच्या महिला शहर उपाध्यक्ष पदावरही कार्यरत होत्या. त्यामुळे पक्षात या कुटुंबाचा प्रभाव ठसठशीत पद्धतीने दिसत होता.
मात्र, अचानक झालेल्या या गळतीमुळे भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या अंतर्गत नाराजीचाही सूर काही कार्यकर्त्यांतून येत असून, प्रभाग १२ ‘अ’ सोबतच संपूर्ण स्टेशन विभागात भाजपच्या जिंकण्याच्या शक्यता कमी होऊ शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणाऱ्या राहुल पाटील यांच्या मैदानात येण्याने स्थानिक निवडणुकीच्या समीकरणात मोठा बदल होणार हे स्पष्ट झाले आहे. आगामी काही दिवसांत या राजकीय घडामोडींना कोणते नवे वळण मिळते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/increase-in-the-number-of-opposition-candidates-in-murtijapur-municipal-council-elections-main-reason-is-tension-and-resentment-within-the-parties/