अकोलाच्या दोन कराटेपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
बारामती – राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अकोलाचा डंका
बारामती येथे येत्या २२ व २७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी अकोला जिल्ह्यातील दोन कराटेपटूंची निवड झाल्याची अभिमानास्पद माहिती समोर आली आहे.
अकोला शालेय विभागीय कराटे स्पर्धेत फ्लॉरेन्स नाशिककर (१८ वर्षे, ४८ कि.ग्रा.) हिने अप्रतिम कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर आपली जागा पक्की केली आहे. त्याचप्रमाणे शिवानी गोपाल पुंडकर (१४ वर्षे, ६८ कि.ग्रा.) हिनेही उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांकाचे मानस्थान मिळवत बारामती स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
Related News
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
अकोला पासपोर्ट कार्यालयात अतिरिक्त काउंटर, कर्मचाऱ्यांची मागणी
अकोला, दि. १२ ऑगस्ट २०२६ : अकोला आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला येथील पासपोर्ट कार...
Continue reading
आकोट | प्रतिनिधी
आकोट शहराच्या राजकीय व प्रशासकीय जीवनातील महत्त्वाचा क्षण ठरलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मायाताई विवेकराव धुळे
Continue reading
अकोल्याला विमान पायलट प्रशिक्षण केंद्राची मंजुरी मिळाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासात मोठा टप्पा गाठला गे...
Continue reading
दहिगाव गावंडे (प्रतिनिधी): आई-वडील हे कुटुंबाचे आधारस्तंभ असतात, परंतु यामध्ये वडील हे मुख्य आधार मानले जातात. वडिलांचे छत्र हरवल्यास कुटुंबाला द...
Continue reading
अकोट – प्रहार संघटनेतर्फे भारत कपास निगमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एकरी ११ क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा निश्चित करून तात्काळ खरेदी सुरू करण्याची म...
Continue reading
३५ वर्षांपासून निंबा फाटा ते काजीखेळ रस्त्याची दुरुस्ती नाही; नागरिक त्रस्त, वाहनधारकांची डोकेदुखी, एसटी महामंडळ वैतागले
निंबा-अंदुरा सर्कलमधील अकोला जि...
Continue reading
अकोट नगराध्यक्ष निवडणूक मध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित पक्षांचे राजकीय समीकरण रंजक! उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया, जातीय समी...
Continue reading
भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप ..
लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्व...
Continue reading
श्रीकांत पाचकवडेअकोला : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत...
Continue reading
दोन्ही प्रतिभावंत खेळाडूंना सुहासिनीताई धोत्रे (समाजकार्यकर्ता),सैय्यद जावेद अली (क्रीडा परिषद सदस्य), सिहान अरुण साखान (अध्यक्ष, महाराष्ट्र अॅमॅच्युअर कराटे असोसिएशन),
वासुदेव वाधा पाटील (महासचिव)यांच्या हस्ते अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
या उल्लेखनीय यशाचे श्रेय डॉ. सेन्साई खुशबू चोपडे (कार्यसचिव, महाराष्ट्र अॅमॅच्युअर कराटे असोसिएशन) यांच्या प्रभावी प्रशिक्षणाला दिले जात आहे.दि.१९ नोव्हेंबर रोजी खेळाडूंचा सत्कार खा. अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी सिहान अरुण सारवान, वासुदेव वाधा पाटील व संदीप गावंडे यांनी दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अकोल्याच्या दोन कराटेपटूंनी राज्य पातळीवर दाखवलेलं हे यश जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलं आहे.
read also : https://ajinkyabharat.com/the-mystery-of-the-dead-body-pyre-and-the-number-94-is-revealed-by-the-keeper-of-the-number-forever/