बाळापूर : राज्यातील नगर पंचायत आणि नगर पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. या प्रक्रियेतील बाळापूर नगर परिषद ही १२ प्रभागांची असून, एकूण २५ नगरसेवकांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया १६ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, आजपर्यंत एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाला आहे.
प्रथम अर्ज प्रभाग क्रमांक १ मधून अनुजातीतून सौ. प्रमिला रमेश हातोले यांनी दाखल केला. हातोले यांचे नामांकन झाल्यानंतर प्रभागातील मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नगर परिषदेकडे येताना त्यांच्या समर्थकांनी फटाके उडवून आणि आतषबाजी करत स्वागत केले.
नामांकन अर्ज स्वीकारताना बाळापूर तहसीलदार इंजि. वैभव फरतारे, निवडणूक विभागाचे कर्मचारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हातोले यांनी आपल्या प्रभागाचा विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि सुंदर नगर निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी प्रभाग क्रमांक १ मधून सदस्य पदासाठी अर्ज दाखल करून अधिकृतपणे नामांकन प्रक्रियेला सुरुवात केली.
Related News
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
मोठी अपडेट! अखेर ठरलं, ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा?
महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा केवळ एक राजकीय कार्यक्रम न...
Continue reading
महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभे न राहिल्याचा VIDEO व्हायरल; भाजपचा आदित्य-अमित ठाकरेंवर निशाणा
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंब आ...
Continue reading
गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर संजय राऊत स्पष्ट; अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचे केले समर्थन
संजय राऊत : नवरात्री उत्सवाला सुरुवात ह...
Continue reading
हारलेल्या जागांवर भाजपचा गेम प्लान! तावडे, बी.एल. संतोष आणि नितीन नवीन यांच्यावर मोठी जबाबदारी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 साठी भाजपची आतापासूनच तयारी; पश्चिम यूपी, अवध आणि...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदे...
Continue reading
राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
राज्यात मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य ...
Continue reading
17 सप्टेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप? संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
17 सप्टेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप...
Continue reading
नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती? अमित शाहांबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि के...
Continue reading
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
Fadnavis उपपंतप्रधान होणार? संघाच्या हालचालींचा संजय राऊतांचा दावा; मोदींच्या वारसदाराच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ
Chief Mi...
Continue reading
दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १२ अर्ज दाखल झाले असले तरी नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे १७ नोव्हेंबर ही शेवटची अर्ज दाखल करण्याची तारीख लक्षात घेता, सोमवार रोजी मोठ्या प्रमाणावर नामांकन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट आणि वंचित पक्षांसह अपक्ष उमेदवारही मोठ्या प्रमाणावर भाग घेण्याची तयारी करत आहेत. प्रभागानुसार सदस्य पदांसाठी विविध उमेदवारांच्या तोंडी स्पर्धा पाहायला मिळणार आहेत.
नगर परिषद निवडणूक ही स्थानिक प्रशासनाच्या विकासासाठी महत्वाची असून, मतदारांनीही आपल्या मताचा उपयोग करण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे.
read also : https://ajinkyabharat.com/murtijapur-municipal-council-election-2025-inspection-of-nakayavar-vehicles-started-2/