डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम – गरजू रुग्णांसाठी सुवर्णसंधी
अकोट (प्रतिनिधी) –
सामाजिक बांधिलकीतून अकोट येथील डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने १२ एप्रिल रोजी
भव्य सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून विविध आजारांवरील तपासणी,
Related News
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अकोला शहरात सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे रॅलीचे भव्य आयोजन; निळ्या भीमसागराची उसळ
अकोल्यात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद;
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये पुन्हा वादळ, शिंदे आणि अजितदादा कार्यक्रमातून वगळले
उपचार तसेच काही शस्त्रक्रिया अत्यल्प दरात उपलब्ध होणार असून गरजू रुग्णांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा काँग्रेस निरीक्षक सुभाषजी धोटे, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष हिदायत पटेल,
जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, उपाध्यक्ष अॅड.
महेश गणगणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत पाचाडे,
तालुकाध्यक्ष अनोक रहाणे आणि शहराध्यक्ष सारंग मालानी उपस्थित राहणार आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांची विनामूल्य सेवा
शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील विशेषज्ञ डॉक्टर विनामूल्य सेवा देणार आहेत:
-
डॉ. श्याम नेमाडे – मधुमेह, थायरॉईड, हृदयरोग
-
डॉ. रोहिणी नेमाडे – स्त्रीरोग
-
डॉ. सुनय दामले – नाक, कान, घसा, सर्जरी
-
डॉ. तेजस ढगे – हाड व मणक्यांचे आजार
-
डॉ. सुमेध धूळधुळे – फिट, अर्धांगवायू, हार्ट स्पेशालिस्ट
विशेष उपचार व शस्त्रक्रिया
या शिबिरात हायड्रोसिल, हर्निया, अपेंडिक्स, कॅन्सर गाठी, जखमा, जळालेले इ. शस्त्रक्रिया,
तसेच पॅरालिसीस, अर्धांगवायू, हार्ट अटॅक, किडनी-लिव्हर संबंधित उपचार, कृत्रिम श्रवणयंत्र,
फॅक्चर व मणक्यांची सर्जरी अत्यल्प दरात केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. श्याम नेमाडे यांनी दिली.
नागरिकांना आवाहन
पंचक्रोशीतील गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजहिताचा व आरोग्यदायी जीवनाचा हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.