अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत योग्य न्याय मिळवून दिला आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
तब्बल १० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कामगारांच्या मागण्या अखेर मान्य करण्यात
आल्या असून, जुन्या कर्मचाऱ्यांना नव्या ठेकेदार कंपनीत पुन्हा सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
कामगारांच्या संघर्षाची पार्श्वभूमी
८ एप्रिलपासून ए.डी.एम. ऍग्रो कंपनीने त्यांची जुनी सुरक्षा पुरवणारी सेफ गार्ड कंपनी हटवून गुरगाव
(हरियाणा) येथील ‘पॅराग्रीन’ कंपनीला नवीन कंत्राट दिले. या निर्णयामुळे गेल्या १० वर्षांपासून सेवा देत असलेले
स्थानिक सुरक्षा रक्षक बेरोजगार होण्याच्या संकटात सापडले.
त्यामुळे या कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर उपोषण सुरू केले होते.
मनसेचा ठाम हस्तक्षेप
कामगारांचे हे दुःख मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कंपनीच्या एच.आर. मॅनेजर चंद्रभूषण शर्मा यांची
भेट घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना नव्या कंपनीतच सामावून घेण्याची मागणी केली.
‘मनसे स्टाईल’ मध्ये समजावणी दिल्यानंतर कंपनीने लेखी आश्वासन देत मागणी मान्य केली.
त्यानंतर पॅराग्रीन कंपनीचे संचालक गुरमीतसिंग यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीतही कामगारांच्या पुन्हा नियुक्तीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
नियुक्ती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.
मनसेच्या प्रयत्नांना कामगारांचा पाठिंबा
कामगारांनी या निर्णयाचे स्वागत करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आणि सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या वेळी परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
उपस्थित मान्यवर
या लढ्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, अकोला शहर अध्यक्ष सौरभ भगत,
मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, तालुकाध्यक्ष सौरभ फाले, तसेच शुभम कवोकार,
मुकेश धोंडफळे, अमोल भेंडारकर, मंगेश देशमुख, निलेश स्वर्गीव, डॉ. प्रसन्न सोनार,
निलेश आगरकर यांची उपस्थिती होती.