अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. “अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असतानाच विलिनीकरणाची घाई कोणी केली, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही,” असं ठणकावून सांगत तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केलं की, ही भेट शपथविधीनंतरची औपचारिक आणि सौजन्यपूर्ण भेट होती.
Related News
नागपूर : महावितरणतर्फे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया घालणारे आणि सहकार चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले...
Continue reading
Smartphone Price Hike : 16 मार्चपासून OPPO आणि OnePlus स्मार्टफोनचे दर वाढणार आहेत. वाढत्या पार्ट्स किंमतीमुळे ग्राहकांना होणार मोठा आर्थ...
Continue reading
Maharashtra मधील व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यात मोठा तुटवडा; नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमधील हॉटेल व उद्योगांवर परिणाम. LPG Short...
Continue reading
Sunetra Pawar Speech : महाराष्ट्र विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांचे पहिले भाषण भावनिक ठरले. महिला सक्षमीकरण, शक्ती कायदा आणि ...
Continue reading
नागपूर : महिलांनी कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याची जपणूक करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, नियमित व्यायाम...
Continue reading
भंडारा जिल्ह्यातील Pawni शहरात एक धक्कादायक आणि तितकाच विचार करायला लावणारा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षेच्या भीतीने अवघ्या 12 वर्षांच्या विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा ब...
Continue reading
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
तटकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधताना संवेदना व्यक्त केल्या. “मोदींनी त्यांना ग्वाही दिली की केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे. पक्ष, संघटना आणि राज्याच्या व्यापक हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असा संदेश त्यांनी दिला,” असं तटकरे यांनी सांगितलं. तसेच, “केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सवाल उपस्थित केला. “दुःखद प्रसंगात, अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली होती? त्या काळात घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी कोणाची होती?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचं ठोस उत्तर अद्याप समोर आलेलं नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून, आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/deputy-chief-minister-sunetra-pawars-visit-to-delhi-detailed-discussion-with-prime-minister-modi-and-amit-shah/