अकोला | प्रतिनिधी – अकोला जिल्ह्यात आज NEET 2025 ही महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा 18 केंद्रांवर पार पडत आहे.
या परीक्षेसाठी 7 हजार 848 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून,
अकोला शहरातील 17 व अकोटमधील 1 केंद्रावर परीक्षा घेतली जात आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
परंतु, परीक्षेच्या व्यवस्थेबाबत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
शहरातील काही परीक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची आणि बसण्याच्या सुविधांची कमतरता होती.
त्यामुळे बाहेरगावावरून आलेल्या पालकांना तासन् तास भर उन्हात उभे राहावे लागले.
याशिवाय, परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ऐनवेळी आधार कार्डची झेरॉक्स मागण्यात आली,
जी पूर्वसूचनेत नमूद नव्हती. त्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी अस्थिरता व नाराजी व्यक्त केली.
परीक्षेचा वेळ दुपारी 2 ते संध्याकाळी 5 असा असून, प्रवेश सकाळी 11 वाजल्यापासून सुरू करण्यात आला.
दुपारी दीडनंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात येणार, असे स्पष्टपणे सूचनांमध्ये नमूद करण्यात आले होते.
त्यामुळे वेळेच्या आधी पोहोचण्याचे मोठे दडपण विद्यार्थ्यांवर होते.
अकोला जिल्ह्यातून हजारो विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी NEET परीक्षा दिली असून,
अशा महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान प्रशासनाने सुविधा पुरवण्याची जबाबदारी अधिक काटेकोरपणे पार पाडणे गरजेचे असल्याचे मत पालकांमधून व्यक्त करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/incompatible/