कौटुंबिक वादातून संतापजनक घटना

अकोल्यात पतीने पत्नी व चार वर्षांच्या मुलीचा खून केला; कौटुंबिक वादातून संतापजनक घटना

अकोला | प्रतिनिधी – अकोल्यातील तार फाईल परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.

सूरज गणवीर नावाच्या एका पतीने कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नी आणि ४ वर्षांच्या मुलीची हत्या केली.

या क्रूर घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related News

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांचेही हे दुसरे लग्न होते

आणि त्यांच्या नात्यात कायमस्वरूपी वाद निर्माण होत होते. दैनंदिन भांडणांतून आजचा वाद अत्यंत तीव्र झाला

आणि संतप्त अवस्थेत सूरज गणवीर याने आधी पत्नीचा गळा आवळून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ती मरण पावली नाही म्हणून त्याने दुपट्ट्याने गळा आवळत तिचा खून केला.

त्यानंतरही तो थांबला नाही. त्याने स्वतःच्या चार वर्षांच्या चिमुकलीलाही गळा आवळून ठार केले.

ही अमानुष कृती केल्यानंतर स्वतःच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भय व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-neet-testersisath-7848-vidyarthani-attendance/

Related News