अकोल्यात भीषण अपघात

अकोल्यात भीषण अपघात – दुचाकी आणि 407 वाहनात धडक; दोघे युवक गंभीर जखमी

अकोला | प्रतिनिधी – अकोल्यातील मोठी उमरी परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात झाला.

शिव मंदिराजवळ श्री संत गुलाब बाबा बँड पार्टीची 407 गाडी आणि दुचाकी

यांच्यात जोरदार धडक होऊन दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.

Related News

प्राप्त माहितीनुसार, 407 गाडी (MH 30 L 2093) कार्यक्रम आटोपून टॉवर चौकाकडे जात असताना,

MH 28 AH 5826 या क्रमांकाची दुचाकी समोरून भरधाव वेगात आली आणि दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.

या अपघातात प्रवीण वानखडे आणि आनंद जंजाळ हे दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाले.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांना ओझोन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

घटनेचा व्हिडिओ जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून,

सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

Read Also :
https://ajinkyabharat.com/chardham-yatra-karanar-sopi/

Related News