अकोट :
विद्यांचल द स्कूल, अकोट येथे राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात व सकारात्मक संदेशासह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुलींचे हक्क, त्यांचे सक्षमीकरण तसेच समाजातील त्यांचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.
बालिका दिनानिमित्त सेव्हियर व रिफॉर्मर हाऊसच्या वतीने उत्कृष्ट परिपाठाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली रंगतदार नाटिका व नृत्यविभागातील वेधक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात शाळेतील तसेच शाळेबाहेरील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा रोपे देऊन सन्मान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे या सर्व रोपांचे वृक्षारोपण विद्यार्थिनींच्याच हस्ते त्यांच्या नावाने करण्यात आले.
वृक्ष जसे सातत्याने वाढून समाजाला प्राणवायू देतात, त्याचप्रमाणे मुलींनीही समाजात स्वतःचे वेगळे व सशक्त स्थान निर्माण करावे, हा या उपक्रमामागील मुख्य संदेश होता. याप्रसंगी विद्यार्थिनींसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तसेच ब्रेसलेट डेकोरेशन, हेअर बँड डेकोरेशन, नेकलेस डेकोरेशन व किचन डिझायनिंग अशा विविध कौशल्याधारित स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळाला.
Related News
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! 10 हून अधिक भौतिक सुविधांचे दिमाखात लोकार्पण
कुरणखेड : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कुरणखेड येथील गजानन महाराज विद्यालयात शैक्षणिक ...
Continue reading
CET मध्येही महाघोटाळा? आरोपांवर CET सेलचं स्पष्टीकरण; आयुक्त दिलीप सरदेसाईंनी सांगितलं, “पर्सेंटेज आणि पर्सेंटाइलची तुलना चुकीची”
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांवरून...
Continue reading
अकोट शहरातील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे. शाळेच्या संरक्षक भिंती अनेक ठिकाणी पडल्याने परिसरात मोकाट जनावरे व्यसनाधीन ...
Continue reading
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १०वी व १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक, गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, अर्जाची ...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या माकडाने मागील दहा दिवसांपासून धुमाकूळ घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. सुरुवातीला लीलाबाई रेखाते यांच्यावर हल्ला...
Continue reading
MHT CET CAP 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! इंजिनिअरिंग आणि MBA प्रवेश नोंदणीला 16 जुलैपर्यंत मुदतवाढ; जाणून घ्या 5 मोठे अपडेट्स
मुंबई: महाराष्ट्रातील अभियांत्रिकी (Engineeri...
Continue reading
Navodaya Admission 2027: नवीन नियम जाहीर! स्थानिक विद्यार्थ्यांनाच मिळणार प्रवेशाची संधी
ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या...
Continue reading
'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येदलापूर शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. छाप्यात ती...
Continue reading
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष आणि अकोला जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणात अकोट सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्याय...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धारूर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी नवघन हरी सबाळ यांच्या म्हशीचा इलेक्ट्रिक पोलच्या तानाला (स्टे वायर) करंट लागल्याने जागी...
Continue reading
आकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागरातून श्री संत वासुदेव महाराज पालखीचे पंढरपूर वारीसाठी भव्य प्रस्थान झाले. हरिनाम, अभंग, दिंडी, पुष्पवृष्टी, वारकऱ्यांना विमा सुरक्षा आणि शहरभर झा...
Continue reading
विषय: MAHA TET Exam Guidelines 2026 | हॉल नियम, सुरक्षा तपासणी आणि परीक्षा व्यवस्था
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित केली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA...
Continue reading
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी आवेस खान, भावना पांडे व विभा पेठे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. शाळेचे संचालक दिनेश भुतडा, सारिका भुतडा व प्रशासकीय अधिष्ठाता प्रशांत विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत हर्षोल्हासात संपन्न झाला.
read also : https://ajinkyabharat.com/pratap-sarnaik-yachan-auchoonsat-paani-ananaram-patra-ajit-pawarchya-yammoniini-man-helavalan/