मूर्तिजापूर आगारात शुक्रवार (ता. १६) रोजी इंधन बचत मासिक मोहिमेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूर्तिजापूरचे निदेशक श्री. श्री. निघोट सर यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विभागीय अभियंता श्री. प्रशिक पळसपगार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना श्री. निघोट सर यांनी इंधन बचत ही केवळ वैयक्तिक नव्हे तर राष्ट्रीय गरज असल्याचे नमूद केले. आर्थिक शिस्त राखण्यासाठी व राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी इंधनाचा काटकसरीने आणि शास्त्रशुद्ध वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी चालक व वाहकांना आवाहन केले.
याप्रसंगी श्री. पळसपगार यांनी इंधन बचतीचे महत्त्व स्पष्ट करत सध्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत इंधन बचत अपरिहार्य असल्याचे सांगितले.
Related News
मूर्तिजापूर : तालुक्यातील मधापुरी येथील पालक प्रदीप हरीदास ठाकरे यांनी अकॅडमी हाइट्स पब्लिक स्कूलच्या कारभाराविरोधात गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुली...
Continue reading
मूर्तिजापूर : समता नगर येथील महाराष्ट्र संगीत विद्यालयात संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीतमय आदरांजली कार्यक्रम आयोज...
Continue reading
अकोला-मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोनोरी गावाजवळ टिप्पर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला. बचाव पथक व पोलिसांनी तात...
Continue reading
महिला आरक्षित व नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) प्रभागातील सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रां बाबत तक्रारी दाखल;बाळापूर ताप्र : गेल्या काही महीण्या आगोदर नगर परिषद निवडणु...
Continue reading
अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द ते करी या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. क...
Continue reading
माना पोलीस स्टेशन हद्दीतील कुरूम–माना रेल्वे मार्गावरील खांबा क्रमांक 636/25-27 जवळ अप ट्रॅकच्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा इस...
Continue reading
अकोला शहरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण ताथोड नगर परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीत दोन घरांतील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले...
Continue reading
रामापूर (ता. अकोट) : अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रामापूर या गट ग्रामपंचायतीत घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील अल्पभूधारक श...
Continue reading
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात गेल्या काही दिवसांपासून गौणखनीज, माती आणि वाळू चोरीसाठी माफियांची सक्रियता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दहिहांडा पोलिस ठाण्यात अलीकडेच माती च...
Continue reading
नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेच्या जुन्या अग्निशमन दलाच्या उभ्या असलेल्या गाडीचे चाक अज्ञात इसमाने जॅकच्या साहाय्याने काढून ...
Continue reading
अकोट : शासकीय सार्वजनिक वाचनालय अकोट यांच्या वतीने आयोजित जिल्हा वार्षिक ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथद...
Continue reading
समाजसेवेचा वसा जपत गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या सौ. संध्या अनिल डाहेलकर यांना डॉ. सिंधुताई सपकाळ नारी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीसंत गाडगेबाबा यांच्या ...
Continue reading
अध्यक्षीय भाषणात आगार व्यवस्थापक श्री. हेमंत चांदुरकर यांनी जागतिक राजकारण व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा संदर्भ देत भविष्यात इंधन दर स्थिर राहण्याची शक्यता कमी असल्याचे नमूद केले. त्यामुळे प्रत्येक स्तरावर इंधन बचतीची सवय लावणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक श्री. हिंगे साहेब यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सोपान विरोकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विवेक खाडे यांनी मानले.मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. उज्वला पांडे, श्री. नितीन पांडे, स्वाती चौधरी, श्री. संतोष घोगरे तसेच पाळी प्रमुख श्री. मुन्ना लाटे, श्री. मुळे व श्री. धामणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
read also : https://ajinkyabharat.com/due-to-e-kyc-confusion-ladki-bahin-scheme-left-november-december-weeks-in-trouble-for-women/