बाल वैज्ञानिक भविष्याची गुंतवणूक – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

बाल वैज्ञानिक प्रदर्शनी

वर्धा: जिल्हास्तरीय 53 व्या बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जे. बी. सायन्य महाविद्यालयात केले.

पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले, देशातील अनेक वैज्ञानिकांनी नवनवीन शोध घेऊन देशाचा गौरव वाढवला आहे. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना समान संधी मिळणे आवश्यक असून, बाल वैज्ञानिक प्रदर्शनी यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. “बाल वैज्ञानिक भविष्याची गुंतवणूक आहेत आणि त्यांना प्रेरणा देणे गरजेचे आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.

शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील आहे. राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनींमध्ये बक्षीस रक्कमेची वाढ करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिले. तालुका स्तरावरील विजेत्यांना नागपूरमधील सी. व्ही. रमन सायन्स सेंटर, जिल्हास्तरावरील विजेत्यांना इस्रो आणि राज्यस्तरीय विजेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायन्स सेंटरला भेट देण्याची तरतूद येत्या काळात होणार आहे.

Related News

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक बुध्दी, नवनवीन कल्पना व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व सांगितले. संजय भार्गव म्हणाले, “शिक्षण आणि विज्ञान यांना जोडून संशोधनावर भर देणे आवश्यक आहे.”

उद्घाटनानंतर पालकमंत्री आणि मान्यवरांनी प्रदर्शनी पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन मिनल गिरडकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. प्रदीप टेकाडे यांनी मानले. जिल्हाभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

read also : https://ajinkyabharat.com/organization-of-constitution-public-awareness-questionnaire-on-national-youth-day/

Related News