वर्धा – १२ जानेवारी : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने “संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५–२६” या राज्यस्तरीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान भारतीय संविधानातील मूल्ये, मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांवर आधारित नागरिक कसे घडतात, याबाबत सखोल माहिती व मार्गदर्शन मिळेल.
उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी इच्छुक विद्यार्थ्यांनी १० जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. “घर घर संविधान” या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक घर आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही जनजागृती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रश्नमंजुषा इयत्ता ८ वी पासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षण १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रारंभ होईल.
प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथील तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करतील व आवश्यक अध्ययन साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. ही स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये आयोजित केली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन प्रॉक्टरिंगसह परीक्षा घेतली जाईल. सहभागी होण्यासाठी केवळ ९९ रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.
Related News
मोठा दिलासा! विदर्भातील शाळा तब्बल 7 दिवस उशीरा सुरू; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रा...
Continue reading
NEET MDS 2026: 5 तास झोप, अथक मेहनत आणि AIR-1; नमिरा सिद्दिकीची प्रेरणादायी यशोगाथा
देशात नंबर 1! नागपूरच्या नमिरा सिद्दिकीने NEET MDS 2026 मध्ये घडवला ऐ...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या हिताच...
Continue reading
ABHA Card : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ५ लाखांचे विमाकवच; ‘हे’ कार्ड काढणे बंधनकारक, शिक्षण विभागाचे तातडीचे आदेश
राज्यातील जिल्हा परिषद तसेच ...
Continue reading
१९९० च्या दशकात संपूर्ण देशाला वेड लावणाऱ्या ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार Zaheer Alam यांचे सोमवारी नागपुरात नि...
Continue reading
‘तुम तो ठहरे परदेसी…’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; सुपरहिट गाणं देऊनही आयुष्यभर राहिले संघर्षात
90 च्या दशकाला वेड लावणाऱ्या गीतकाराचा अंत, चाहत्यांमध्ये हळहळ
1990 च्या दशकात प्...
Continue reading
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरण आणि महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन
नागपूरमध्ये जयंतीनिमित्त विविध कार्यालयांत आदरांजली कार्यक्रम, अधिकाऱ्यांची मोठ...
Continue reading
कचऱ्याच्या आगीमुळे नागपूरच्या वाठोडा परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत; ३३ केव्हीच्या चार केबल जळून खाक
प्रजापती चौक, नाग नदी पुलाजवळील साचलेल्या कचऱ्याला लागलेल्या भीषण आगीमुळे आज (दि...
Continue reading
मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षित तिकीट केंद्र...
Continue reading
नागपूर: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरण अजून चर्चेत असतानाच, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे न...
Continue reading
नागपूरमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अशक्य वाटणारी गोष्ट घडली आहे. एका भीषण अपघातात मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या ११ वर्षीय मुलाला सलग १०० मिनिटे CPR (कार्डिओपल्म...
Continue reading
स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आकर्षक पारितोषिक ठरवण्यात आले असून प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय ५१ हजार रुपये, तृतीय ११ हजार रुपये आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
नोंदणी आणि अधिकृत माहिती www.yuvacareer.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही बनावट संकेतस्थळाला बळी न पडता फक्त अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/the-bjp-shiv-sena-nationalist-congress-alliance-in-arni-municipal-council-is-paving-the-way-for-establishment-of-power/