अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन!

पिकविम्याची

पिकविम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी आक्रमक. 

यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देताना

कंपनीने पुन्हा शेतकऱ्याची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.

Related News

शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दोनशे ते एक हजार रुपयापर्यंत देण्यात आल्याने

संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

पंचनामे करताना त्यावर नुकसानीचे क्षेत्र न टाकल्याने

शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे.

शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला

परंतु शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने

ठिय्या आंदोलनाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसल आहे.

शासन जो पर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले

आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत ते का मिळाले नाहीत?

याच उत्तर मिळे पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.

Read also: https://ajinkyabharat.com/attempt-to-commit-suicide-by-a-village-servant/

Related News