मुंबई शहर धोकादायक; लँसेटच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर.
भारतातील १० शहरे अशी आहेत,
ज्याठिकाणी वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत आहेत.
Related News
या शहरांमध्ये दरवर्षी ३३ हजार मृत्यूंना वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे.
लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून
भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.
वायू प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
पायाभूत सोयी-सुविधा, नागरी वसाहती कारखानदारी,
रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे.
ज्याप्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत,
त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे.
रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला
आणि पर्यायाने मानवाला हानीकारक ठरत आहे.
दिल्लीमध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमधील जवळपास ११.५ टक्के
म्हणजेच १२,००० मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत.
लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून
भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.
भारतातील १० शहरांमध्ये जवळपास सात टक्के मृत्यू
वायू प्रदुषणामुळे होत आहेत.
तर वर्षभरात जवळपास ३३ हजार लोकांना वायू प्रद्यणाला बळी पडावे लागत आहे,
असाही दावा लँसेटच्या अहवालात करण्यात आला आहे.
भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता,
मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी या प्रमुख शहरांचा समावेश होतो.
यापैकी शिमलामध्ये वायू प्रदूषणाला बळी पडणाऱ्यांची सर्वात कमी संख्या आहे.
याठिकाणी वर्षभरात केवळ ५९ मृत्यू वायूप्रदूषणामुळे झाले आहेत.
लॅसेट प्लॅनेटरी हेल्थ’मध्ये सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
शिमलामध्ये सर्वात कमी वायू प्रदूषण
वायू प्रदूषणामुळे मुंबईत दरवर्षी ५१००, बंगळुरूमध्ये २,१००,
चेन्नईत २,९०० आणि कोलकातामध्ये ४,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
सर्वात कमी वायू प्रदूषण हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये आढळून आले आहे.
दऱ्याखोऱ्यातही वायू प्रदूषणाची समस्या आता जाणवू लागली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/hemant-soren-took-oath-as-chief-minister/