Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला : शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे कार्यरत पोलीस अंमलदार गिरीष दशरथ खडके रा. बलोदे लेआउट, हिंगणा रोड यांच्या पत्नी सौ. आरती खडके यांचे मोबाईलवरील व्हॉट्सअॅप अकाऊंट अज्ञात इसमाने हॅक केले. त्यानंतर त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून तब्बल 1 लक्ष 70 हजार इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेण्यात आली. या संदर्भात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
Related News
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
केतन अग्रवाल प्रकरणात नवे धक्कादायक दावे; सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत तपासात समोर आले नवे तपशील
पुण्यात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात तप...
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत....
Continue reading
सैनिक हत्या : अकोल्यातील भारतीय सैन्यातील जवान सुशील तेलगोटे हत्या प्रकरणात आरोपी अंकित उर्फ छोटू खंडारे याचा जामीन न्यायालयाने रद्द केला. धमक्या...
Continue reading
अकोल्यात अकस्मात मृत्यूचा बनाव करून खून लपविण्याचा प्रयत्न एलसीबीने अवघ्या 3 तासांत उधळून लावला. पैशांच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य आ...
Continue reading
ही घटना दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३:१२ ते ३:३० या दरम्यान घडली. हॅक झालेल्या मोबाईलवरून संशयित इसमाने त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून अनुक्रमे पन्नास हजाराचे तीन वेळा ट्रांजेक्शन केले तर २० हजाराचे चौथे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करून एकूण १.७० लाख रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी सौ.आरती खडके यांनी तात्काळ खदान पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३१८(४) भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच कलम ६६(D) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर खदान पोलीस ठाण्याने तपासाची चक्रे गतीमान केली आहेत.
पोलिसांकडून बँकेशी संपर्क साधून सर्व व्यवहारांचे तपशील मागविण्यात आले आहेत. तसेच संशयिताने कोणत्या आयपी ऍड्रेसवरून व्यवहार केले याचा डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे.तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संशयिताने कोणत्या तरी पद्धतीने पीडितेचा OTP किंवा खाते ऍक्सेस प्राप्त करून हे व्यवहार केले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून मोबाईल फोन, व्हॉट्सअॅप लॉग आणि व्यवहारांचे ट्रेल्स तपासण्यात येत असून, पैसे ज्या खात्यांमध्ये पाठवले गेले आहेत त्यांची माहिती गोळा केली जात आहे.
पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस OTP, बँक तपशील अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच व्हॉट्सअॅपमध्ये दोन-घटक प्रमाणीकरण सुरू ठेवावे, असा सल्लाही दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/income-tax-free-countries-such-10-countries-where-your-income-remains-safe-and-tax-free/