नवी दिल्ली | 8 मे 2025 — जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर
भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील 9 दहशतवादी ठिकाणांवर
6-7 मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार हल्ले करून दहशतवाद्यांच्या गडांना लक्ष्य केले.
Related News
रोनाल्डोच्या एका चाहत्याने शहरभर पोस्टर्स लावून QR कोडद्वारे ७ रुपयांचे डोनेशन मागितले. दोन दिवसांत १,२०० रुपये जमा करून त्याने रोनाल्डोच्या विजयासाठी...
Continue reading
27 दिवसांचा तुरुंगवास ते 14 कोटींची संपत्ती! रिया चक्रवर्तीच्या संघर्षमय पण दमदार पुनरागमनाची थक्क करणारी कहाणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्र...
Continue reading
राघव चड्ढा यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दणका; 52 पोस्ट हटवण्याची मागणी फेटाळली, 'राजकीय व्यंग हा लोकशाहीचा भाग'
दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभा खासदार
Continue reading
Microsoft कर्मचाऱ्याचा खळबळजनक आरोप; राजीनामा देत कंपनीची 'सीक्रेट फाईल' उघड, AI सेवांवर गंभीर प्रश्न
जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक अस...
Continue reading
व्हेनेझुएलात भारतीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; शवातून हृदय, किडनी, फुफ्फुसासह 21 अवयव गायब
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील एका भारतीय खलाशाच्य...
Continue reading
चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात? 7.7 अब्ज युनिट वीज निर्माण करणारा 'वॉटर बॉम्ब' तयार; ईशान्य भारतावर संकटाची भीती
नवी दिल्ली : चीनने तिबेटमधून वाहणाऱ्या य...
Continue reading
अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी प्रकरणावर 'रामायण' फेम सुनील लहरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाल्य...
Continue reading
WhatsApp चे 7 मोठे बदल! मोबाईल नंबरशिवाय चॅटिंगसाठी Username फीचरची सुरुवात
जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या वा...
Continue reading
जो पाणी अडवेल त्याचे हात कापू; सिंधू जल करारावरून पाकिस्तानच्या मंत्र्यांची संतप्त धमकी, भारताच्या भूमिकेनंतर नवा वाद
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील
Continue reading
8वा वेतन आयोग: 2.57 फिटमेंट फॅक्टरचा धक्का? किमान ₹69,000 पगाराचे स्वप्न धोक्यात, जाणून घ्या संपूर्ण गणित
आठव्या वेतन आयोगात 2.57 किंवा 2.86 फिट...
Continue reading
43-इंचाचा Google TV गुपचूप ऑर्डर! 'मला कार्टून पाहायचं होतं' म्हणत चिमुकल्याचा भन्नाट प्रताप; VIDEO तुफान VIRAL
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांचा स्मार्ट...
Continue reading
भारताच्या या अचूक आणि संयमित कारवाईला अमेरिका, फ्रान्स, इस्रायल आणि अनेक युरोपीय देशांनी पाठिंबा दर्शवला असून,
ही कारवाई दहशतवादविरोधी योग्य पावलं असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, तुर्किए, अज़रबैजान आणि कतार
या तीन प्रमुख मुस्लिम देशांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेत भारताच्या कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे.
तुर्किएची तीव्र प्रतिक्रिया
तुर्किएच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत म्हटलं की,
“भारताच्या या कारवाईमुळे युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. आम्ही भडकावू पावलं आणि नागरिक ठिकाणांवर हल्ले यांचं समर्थन करत नाही.
” त्यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि कूटनीतिक मार्गाने तोडगा शोधण्याचे आवाहन केले. भारताने मात्र स्पष्ट केलं आहे की,
कारवाई केवळ दहशतवादी तळांवरच झाली असून कोणत्याही नागरी किंवा सैन्य प्रतिष्ठानावर हल्ला करण्यात आलेला नाही.
अज़रबैजान आणि कतारचा संयमी विरोध
अज़रबैजाननेही भारताच्या कारवाईला आक्रमक ठरवत निंदा केली आहे.
त्यांनी पाकिस्तानातील नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केलं.
याउलट कतारने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं असून,
शेजारी देश म्हणून शांततापूर्ण तोडगा शोधण्यावर भर दिला आहे.
पाकिस्तानचा आक्षेप आणि भारताची स्पष्टता
पाकिस्तानने ही कारवाई “युद्धाची घोषणा” असल्याचं सांगत तीव्र निषेध केला आहे.
त्यांनी यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघ आणि OICमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भारताने मात्र पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, या कारवाईत फक्त जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि
हिजबुल मुजाहिदीन यांच्या गडांना लक्ष्य केलं असून कोणतीही नागरी हानी भारताच्या कारवाईत झालेली नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-ankhi-a-motha-decision/