आषाढीयात्रेसाठी अकोला नियंत्रक विभागातून यंदा २४५
यात्रा बसेसची सुविधा असून, अकोला विभागातील ५५
आणि बाहेरील डेपोतून ९० बसेस पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत,
Related News
यात्रा बसेसमध्ये सर्व प्रकारच्या प्रवास सवलती लागू राहतील.
सर्व वारकऱ्यांची, भक्त प्रवाश्यांनी आषाढी वारी यात्रा बसेसद्वारे
दर्शन घडविणार असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला वारकरी,
भक्तांनी तसेच दिव्यांगासह १० जुलैला १७ गाड्या, ११ जुलैला ३१ गाड्या
आणि आज १२ जुलैला ३० गाड्या अश्या एकूण ७८ गाड्या सवलतधारक प्रवाशांसह
विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे पोहोचल्या आहेत,
अशी माहिती अकोला विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी केली आहे.
लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीसह
भविकांना विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचे वेध लागले आहेत.
१३ ते २२ जुलै या कालावधीत आषाढी पंढरपूर यात्रा होत आहे.
त्यांसाठी विठुनामाचा जयघोष करत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी
एसटीने यात्रा काळात अकोला विभागातील प्रवाश्यांसाठी ९ आगारांतून व्यवस्था केली आहे.
आषाढी एकादशी यात्रेचे पंढरपूरसाठी नियोजनाकरिता विभाग नियंत्रक
शुभांगी शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन समितीची कार्यात्वित असून,
यात्रा नियोजन जबाबदारी निश्चित करण्यात आल्यानुसार पार पाडली जात आहे.
अकोला नियंत्रक विभागातील अकोला व वाशिम जिल्ह्यातून
२५ बसेस पंढरपूर यात्रेसाठी धावणार आहेत.
कोणत्याही गावातून ४४ किंवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाश्यांनी
एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पढरपूरला जाण्यासाठी
त्यांच्या गावातून एस. टी. बस उपलब्ध होणार आहे,
या बसमधून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाश्यांना
सवलतीत प्रवास करता येणार आहे.
त्यानुसार १० जुलैला १७, ११ जुलैला ३१ आणि १२ जुलैला ३० गाड्या
श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाल्या आहेत.
अकोला विभागातून गाड्यांचे नियोजन
अकोला १ = ३४, अकोला २-४६, अकोट १८ कांरजा = १९,
मंगरूळपीर = १९, वाशिम १९, रिसोड ४६, तेल्हारा ४२
आणि मूर्तिजापूर = १३ अश्या एकूण २४५ गाड्या पंढरपूर येथे
प्रवासी भाविकांची ने-आण करणार आहेत.
यातील गाड्यांमधून पंढरपूर सोहळ्यासाठीही बसेस सोडण्यात येणार आहेत.