रांची: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना झारखंडची राजधानी रांचीमध्ये सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) धाडसत्र सुरु आहे. मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या नोकऱ्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड हाती लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ईडीच्या हाती जवळपास २५ कोटी रुपयांची रोख रक्कम लागली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात आलमगीर आलम यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर ईडीनं तपास सुरु केला.
आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरु असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. भ्रष्टाचाराचा पैसा नोकरांच्या घरी जात असल्याची टिप ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला. या नोकराला दरमहा १५ हजार रुपये पगार मिळतो. पण त्याच्या घरी कुबेराचा खजिना सापडला. घरात सापडलेली रोकड मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन मागवण्यात आल्या.
गेल्या वर्षीच्या मे महिन्यात मुख्य अभियंत्याच्या घरावर १० हजारांच्या लाच प्रकरणी छापा टाकला होता. त्यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. मंत्र्यांकडे लाचेचा पैसा कसा पोहोचवला जातो याची इंत्यभूत माहिती त्यानं दिली. त्यानंतर झारखंडचे ग्राम विकास मंत्री आलमगीर आलम यांचं नाव पहिल्यांदा भ्रष्टाचार प्रकरणात समोर आलं. या प्रकरणाचा तपास सुरु असताना आलमगीर यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचं नाव समोर आलं. संजीव लाल यांच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकराच्या घरावर धाड टाकण्यात आली. तेव्हा तिथे कोट्यवधींची रोकड सापडली.
Related News
आजच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत नव्याने मोठी चर्चा सुरू झा...
Continue reading
अंबरनाथ नगरपरिषदेच्या सभेत शिंदे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी 'थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे' असे वादग्रस्त...
Continue reading
आमदार धीरज लिंगाडेंची पहिली स्पष्ट प्रतिक्रिया
धीरज लिंगाडे : राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून पक्षांतर, बंडखोरी आणि राजकीय दाव्यांमुळे वातावरण तापले आहे. ...
Continue reading
Parliament Monsoon Session २० जुलै ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षफुटी, १३१वे घटनादुरुस्ती विधेय...
Continue reading
पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ! अमित शहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; काँग्रेस फुटणार की केवळ राजकीय योगायोग?
पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील का...
Continue reading
अकोल्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना 10 हजारांच्या लाचप्रकरणी अटक. जळगावातील घरातून तब्बल 2.94 कोटींची रोकड, सोने आणि कागदपत्रे जप्त.
...
Continue reading
10 तासांच्या ACB धाडीत दीड कोटींची रोकड, अर्धा किलो सोनं जप्त; मुद्रांक अधिकाऱ्याच्या घरातून धक्कादायक घबाड
जळगाव: राज्यातील भ्रष्टाचारविरोधी कारवायांमध्ये आणखी एका मोठ्या प्रकरणा...
Continue reading
अंबरनाथ पालिकेत खळबळ! उपनगराध्यक्षांचे ‘भ्रष्टाचार’वर धक्कादायक विधान; सभागृहापासून पत्रकार परिषदपर्यंत रंगला वाद
अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभे...
Continue reading
35 कोटींचं आमिष, थलपती विजय सरकार पाडण्याचा कथित कट; 3 जण अटकेत
थलपती विजय सरकारविरोधातील मोठा खुलासा; 3 जण अटकेत
तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ...
Continue reading
झारखंडमध्ये 26 हजार शिक्षक भरती प्रक्रियेदरम्यान काही शिक्षकांना नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर अवघ्या 24 तासांत निवृत्त व्हावे लागले, तर काही शिक्षक आध...
Continue reading
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. परीक्षा होण्यास अवघे 24 तास शिल्लक ...
Continue reading
कोण आहेत आलमगीर आलम?
आलमगीर आलम पाकुड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार आहेत. ते चार टर्मचे आमदार आहेत. सध्या त्यांच्याकडे झारखंड सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्राम विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्याआधी २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ या कालावधीत ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. सरपंच पदाची निवडणूक जिंकून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. आतापर्यंत ते चारवेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत.