जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा कोळासात बिरसा मुंडा जयंती साजरी

जिल्हा परिषद

बाळापूर तालुक्यातील कोळासा गावातील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक मराठी शाळेत शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करून माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी श्री मनोहर सदबल तर उपाध्यक्षपदी सागर सावडेकर यांची निवड झाली.

सोहळ्याची सुरुवात जननायक बिरसा मुंडांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजन व हार अर्पण करून झाली. यावेळी संघाच्या धोरणांवर चर्चा करून सामाजिक उपक्रम व शाळेच्या विकासासाठी विविध कल्पना, सूचना आणि सहकार्याची तयारी दर्शवण्यात आली.

कार्यक्रमास शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. कोमल संगम इंगळे, गावच्या सरपंच रेणुकाताई कारले, माजी विद्यार्थी अब्दुल साबीर, विजय सुरवाडे, विष्णू वाघ, भाग्गेश खडसे, अतुल वानखडे, अक्षय तायडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Related News

शाळेचे मुख्याध्यापक मेळाव्याचे उद्दीष्ट प्रास्ताविकातून सांगितले. संचालन करांगळे सर यांनी केले तर हिरळकर सर, धोत्रे आणि अहिर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले. शेवटी रेवसकर  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

read also : 

https://ajinkyabharat.com/architecture-tied-in-memory-of-father-inaugurated-at-anvi-mirzapur/

Related News