बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे निगूर्णा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचे एक गेट अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे बंधाऱ्यात साठवलेले पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असून, परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वाडेगाव व परिसरासाठी पाणीपुरवठा तसेच शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा कोल्हापूरी बंधारा पाटबंधारे विभागाकडून नियोजित वेळेत साफसफाई करून गेट बसविण्यात आला होता. सध्या बंधाऱ्यात जवळपास ९० टक्के पाणीसाठा अडविण्यात यश आले होते. मात्र, शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास बंधाऱ्यातील एकूण २३ गेटपैकी एका गेटमधून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
ही बाब लक्षात येताच वाडेगावचे सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, माजी उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील मानकर, डॉ. शेख चांद तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोल्हापूरी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची माहिती संबंधित पाटबंधारे विभागाला दिली. तसेच बंधाऱ्यातून होणारी गळती तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
Related News
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मानसिक आणि शारीरि...
Continue reading
पुढील 24 तास धोक्याचे! हवामान विभागाचा पावसाचा रेड अलर्ट; महाराष्ट्रातील 'या' भागांना झोडपणार मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या म...
Continue reading
SC-ST शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन विशेष मोहीम; 31 जुलैपर्यंत महाडीबीटीवर अर्ज, 90% पर्यंत अनुदानाची सुवर्णसंधी
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी...
Continue reading
कारंजा लाड शहरातील हद्दवाढ भागातील विविध कॉलण्यांमध्ये मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांनी याविरोधात एकत्रित येत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवे...
Continue reading
बाळापूर, दि. 24 जून : अकोला-वाडेगाव मार्गावरील नकाशी-भरतपूर दरम्यान बुधवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका म...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील रहिवासी व निंबा फाटा परिसरातील प्रसिद्ध हार्डवेअर व्यावसायिक शिवशंकर तुळशीराम झाडे (वय 52) यांचा खामगाव रोडवरील भीषण अपघातात जागीच मृत्यू ...
Continue reading
अकोट आठवडी बाजारात घनकचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे व्यापारी व नागरिक त्रस्त. 15.15 लाखांच्या ठेक्यानंतरही स्वच्छतेचा अभाव असल्याने वसुली ठप्प, ठेकेदाराची मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी...
Continue reading
महिला आरक्षित व नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) प्रभागातील सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रां बाबत तक्रारी दाखल;बाळापूर ताप्र : गेल्या काही महीण्या आगोदर नगर परिषद निवडणु...
Continue reading
मान्सून काळात तहसीलदारच ‘बॉस’; ‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून थेट अधिकार, नैसर्गिक आपत्तीशी आता चार हात
राज्यात मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असताना आपत्ती व्यवस्थापन अधिक प्र...
Continue reading
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान; घरांची पडझड, जनावरे जखमी
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा भीषण तडाखा; घरांवरील टीनपत्रे उडाली, जनावरे जखमी, अनेकांचे संसार उघड्यावर
बाळापू...
Continue reading
सावरगाव ग्रामसभेत 10 गंभीर मुद्द्यांवर प्रचंड संताप; अपंग निधी, 15 वा वित्त आयोग आणि घरकुलावरून गोंधळ
अकोट तालुक्यातील सावरगाव येथे आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा विविध विकासकामे,...
Continue reading
वाडेगाव परिसरात अन्नसुरक्षेशी संबंधित एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किराणा दुकानांमध्ये मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याचे उघड झाले ...
Continue reading
या बंधाऱ्यावर यापूर्वीही गेट तोडण्याचे किंवा नुकसान करण्याचे प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने हा प्रकार केवळ अपघाती नसून मुद्दाम करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाण्याचा अपव्यय होणे ही गंभीर बाब असून, याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आगामी शेती हंगामाच्या दृष्टीने हा पाणीसाठा अत्यंत महत्त्वाचा असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वाडेगाव व परिसरातील शेतकरी बांधवांसाठी हा कोल्हापूरी बंधारा वरदान ठरला असून, त्याच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच संबंधित पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागानेही तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/dr-babasaheb-ambedkar-pratisthans-valuable-initiative-is-to-provide-life-giving-support-to-widowed-women-through-blood-transfusion/