मुर्तिजापूर – संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दीपक दांदळे यांनी मुर्तिजापूर शहराचे नामकरण ‘डेबूनगर’ करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी केली. त्यांनी या मागणीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने येथील ‘शिवाश्रय’ येथे पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानचे संचालक अनिल डाहेलकर यांनी संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंती वर्षापासून दरवर्षी हा सोहळा साजरा करण्याचे तसेच ‘जाणीव मानवतेची’ या उपक्रमांतर्गत गरजू रुग्णांना साहित्य सेवा देण्याचे संकल्प जाहीर केले. सोहळ्यात संत गाडगेबाबांच्या शिल्पाचे अनावरण करून अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात शिल्पकार प्रकाश उमाळे, चित्रकार गोपाल पवार, समाजसेवक अशोक तिडके तसेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी ईश्वरी वानखडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मिलिंद तायडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गाडगेबाबांचे पणतू सतीश सोनोने, सुभाषराव टाले उपस्थित होते. सतीश सोनोने, प्रा. गोवर्धन इंगोले आणि दिलीप सरदार यांनी संत गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत डाहेलकर परिवाराच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
Related News
10 वर्षांपूर्वी घेतलेला प्रेरणादायी निर्णय! सुनील लहरींच्या वडिलांनी मृत्यूनंतर मेडिकल विद्यार्थ्यांसाठी दान केली स्वतःची बॉडी
गुजरातच्या इतिहासातील 7 धक्कादायक सत्य! जूही चावलाच्या सासरच्यांनी आर्थिक संकटात सरकारला कशी दिली मोठी मदत?
Mother Son Dies : 5 मिनिटांत आई-लेकाचा मृत्यू; कठीण प्रसंगात कुटुंबाचा डोळेदानाचा प्रेरणादायी निर्णय
“धक्कादायक आणि हृदयस्पर्शी: ३ वर्षांच्या बालकाचे ऐतिहासिक अवयवदान – पुण्यात ‘बिग’ बदल घडवणारी ४ जीव वाचवणारी घटना 2026”
ॲड. लखनसिंह कटरे आणि सौ. उषादेवी कटरे यांच्या यशस्वी संसाराचा गौरवशाली प्रवास ; सहजीवनाची प्रेरणादायी 44 वर्षे!
-
By
Vivek Raut
मनोज जरांगे पाटील: 30 मेपासून टोकाचे आमरण उपोषण, मराठा समाजासाठी जीवाची आहुती!
-
By
Vivek Raut
९००० अर्जांमधून चमकदार निवड! मूर्तीजापूरच्या हर्षदा डोंगरेचा राष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद प्रवास
“धक्कादायक 5 खुलासे: अकोल्यातील भोंदू बाबाचा अघोरी प्रकार उघड, चिमुकल्यांवर अमानुष अत्याचार!”
महावितरणचा अनोखा उपक्रम; विशेष विद्यार्थ्यांसोबत साजरी केली आंबेडकर जयंती
‘रक्ताचा एक थेंब, जीवनाचा प्रकाश’; 14 एप्रिलला विशेष शिबिर
कार्यक्रमास मुकुंद नांदेकर, रूपेश चहाकर, राहुल तिडके, अशोक थोरात, मंगेश वाडेकर, सुधीर कडू, उद्धव जाधव, विकास कुरेकर, सौरभ पाटील, सुनील रक्षित, पद्माकर तायडे, अरुण वानखेडे, कृष्णा वानखेडे, शाम ठाकरे, प्रमोद मांडोकर, धीरज धबाले, प्रमोद वानखडे, बबीता वानखडे यांसह अनेक समाजसेवक उपस्थित होते.
गझलकार मिलिंद इंगळे यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले, तर सुनील डाहेलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संध्या डाहेलकर, अनिल डाहेलकर, गजानन खंडारे आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाने सामाजिक एकात्मता, मानवी सेवा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे संदेश दिले, तर शहराचे नामकरण ‘डेबूनगर’ करण्याची मागणीही स्थानिक समाजामध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली.