पूजा खेडकर प्रकरण भोवल्याची चर्चा
केंद्रीय लोकसेवा आयोग चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी
आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
महत्त्वाचे असे की, पाच वर्षांच्याय कार्यकाळावर नियुक्त असलेल्या सोनी यांनी
कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
त्यांचा नियोजित कार्यकाळ सन 2029 पर्यंत आहे.
दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यापाठीमागे ‘वैयक्तिक कारण’ इतकीच माहिती सध्या पुढे येत आहे.
त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे समजते.
देशभर गाजत असलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंत
हा राजीनामा आल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
मनोज सोनी यांनी 2017 मध्ये UPSC सदस्य म्हणून त्यांचा प्रवास सुरू केला
आणि 16 मे 2023 रोजी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
सोनी यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडे जवळपास एक महिन्यापूर्वी राजीनामा सादर केल्याचे वृत्त
प्रसारमाध्यमांन सूत्राच्या हवाल्याने दिले आहेत.
तथापि, राजीनामा स्वीकारला जाईल की नाही आणि त्यांना त्यांच्या कर्तव्यातून
औपचारिकरीत्या केव्हा मुक्त केले जाईल हे स्पष्ट नाही.
केंद्रीय लोकसेवा आयोग आपल्या निकोप आणि पारदर्शी नोकरभरतीसाठी प्रसिद्ध आहे.
तिच त्यांची ओळख आहे. मात्र, मागील काही काळात UPSC उमेदवारांवरील
रोजगार सुरक्षित करण्यासाठी फसवी प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप झाला.
त्या अनुशंघाने काही प्रकरणेही पुढे आली. ज्यामुळे UPSC जोरात चर्चेत आली.
या प्रकरणांच्या वादामुळे तर सोनी यांनी राजीनामा दिला नसेल ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/pawar-announces-second-young-candidate-for-assembly/