इस्रायलने इराणवर मोठा लष्करी हल्ला केला आहे. इस्रायली
सैन्याने (आयडीएफ) म्हटले आहे की त्यांनी इराणमधील लष्करी
लक्ष्यांवर हल्ला केला आहे, कारण ‘इराण आणि त्याचे प्रॉक्सी’
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
काही महिन्यांपासून या प्रदेशात हल्ले करत आहेत. इराणकडून
यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इराणची
राजधानी तेहरानच्या आसपास अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले
आहेत. राजधानीत हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात
आली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्म्स च्या कोणत्याही
लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नाही, असे इराणच्या
माध्यमांनी सांगितले.
इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “इराणी सरकार
आणि या प्रदेशातील त्यांचे प्रॉक्सी ७ ऑक्टोबरपासून इस्रायलवर
सतत हल्ले करत आहेत, ज्यात इराणी भूमीवरून थेट हल्ले होत
आहेत.” निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘जगातील प्रत्येक
सार्वभौम देशाप्रमाणे, इस्रायल राज्यालाही प्रतिसाद देण्याचा
अधिकार आणि कर्तव्य आहे.’ इस्रायलच्या हल्ल्यांदरम्यान,
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी त्यांचे इस्रायली
समकक्ष योव गॅलंट यांच्याशी चर्चा केली आहे. यापूर्वी १
ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता.
इराणने इस्रायलवर सुमारे ३०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती,
त्यापैकी अनेक इस्त्रायलच्या हद्दीत पडली होती. काही क्षेपणास्त्रे
इस्रायलच्या हवाई तळांवरही पडली. या हल्ल्यांनंतर इस्रायलच्या
पंतप्रधानांनी इराणला प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/good-news-for-st-employees-there-will-be-pre-diwali-salary/