थार गाडीच्या टपावर डान्स करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल

थार गाडीच्या टपावर डान्स करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल

नोएडा प्रतिनिधी |

नोएडाच्या सेक्टर-33 येथील इस्कॉन मंदिराजवळील एलिवेटेड रोडवर एका तरुणाने

थार गाडीच्या छतावर चढून मोठ्या आवाजात म्युझिक लावून डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Related News

हा तरुण गाडीवर नाचत असतानाच, दुसरा तरुण गाडीच्या डाव्या बाजूचा पुढील दरवाजा उघडून त्यावर उभा राहत काही बोलताना दिसत आहे.

या काळ्या थार गाडीच्या मागील बाजूस गुर्जर असा शब्द लिहिलेला दिसून आला आहे.

या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी तातडीने दखल घेतली.

गाडी आणि आरोपी तरुणाची ओळख पटवून, ट्राफिक पोलिसांनी मोटर वाहन कायद्यान्वये

(Motor Vehicle Act) कारवाई करत थार गाडीचा 38,500 रुपयांचा चालान केला आहे.

या घटनेमुळे वाहतुकीचे आणि सार्वजनिक ठिकाणचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी इशारा दिला आहे की, सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारचे कृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

Read Also : https://ajinkyabharat.com/hyderabadamadhil-panchrikar-hotella-fierce-fire/

Related News