महाजनांवर मोक्का लावायचा, ठाकरेंचा प्लॅन होता, CM शिंदे यांचा गौप्यस्फोट

ठाणे : चार-पाच लोकांना जेलमध्ये डांबण्याचा त्यांचा प्लॅन झाला होता, त्याच्यामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पण होते, मला स्वतः त्यांनी सांगितले, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांबाबत माझ्याकडे माहिती आली आहे. आता देवेंद्रना सोडत नाही, त्यांना जेलमध्येच घालतो, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घणाघाती टीका केली. यावेळी राज ठाकरे, आनंद दिघे, शिवसेना-भाजप युती, राजन विचारे यांच्याबाबत शिंदे यांनी धक्कादायक खुलासे केले.

महाजनांवर मोक्का लावायचा, भाजपला घाबरवायचे आणि २५ आमदार फोडायचे

ठाणे लोकसभेतील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारी नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ टिपटॉप प्लाझा येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावला जाणार होता, मी म्हटलं, असं करणे योग्य नाही, तर ते म्हणाले मला करायचे आहे, भाजपला घाबरवायचे आहे, त्यांच्या लोकांना जेलमध्ये टाकायचे, आणि भाजपचे २० ते २५ आमदार फोडायचे, असा त्यांचा पूर्णपणे प्लॅन होता. मात्र हा प्लॅन यशस्वी झाला, तर माझा प्लॅन अयशस्वी झाला असता, असा दावा शिंदे यांनी याप्रसंगी करत सत्तांतराबाबत मोठा खुलासा केला.

तुम्ही एकनाथ शिंदेला ओळखलं नाही

देव आपल्या पाठीशी असतो, त्यांना अवदसा आठवली, त्यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनात भाजपबाबत चुकीची भाषा वापरली. त्यानंतर मला विधानपरिषद आणि राज्यसभा प्रक्रियेतून बाहेर काढले, तुम्ही मला ओळखले नाही. हे मी पत्नीला सांगितले, तेव्हा ती म्हणाली की बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आले नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

Related News

भाजपच्या लोकांना आत टाकून पक्ष संपवायचा आणि मलाही संपवायचा असा डाव त्यांचा होता, अशी घणाघाती टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. तरीही माझे एका प्रकरणात खोटे नाव गोवण्याचा प्रयत्न करत कारस्थान रचण्यात आले, कसा राहणार एकनाथ शिंदे, असाही सवाल करत शिंदे यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाबाबत भाष्य केले.

सिनेमात आम्ही खोटे दाखवले

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांची सभागृह नेतेपदी नेमणूक केल्याची आठवण सांगताना तत्कालीन सभागृह नेते राजन विचारे यांनी स्वतःहून येऊन मला ते पद देऊ केले, हा प्रसंग ‘धर्मवीर’ सिनेमात आम्ही दाखवले, ते खोटे होते, दुसऱ्या भागात आम्ही खरे दाखवणार आहे. कारण विचारे यांना आनंद दिघे यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितले होते, मात्र त्यांनी दिला नाही, असा दावा करत शिंदे यांनी आम्ही सिनेमात उलटे दाखवले.

Related News