शिमला: हिमाचल प्रदेशातील मंडीमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेली अभिनेत्री कंगना राणौत तिच्या विधानांमुळे सातत्यानं चर्चेत असते. त्यामुळे मंडी मतदारसंघ देशपातळीवर चर्चेत आला आहे. सध्या कंगनाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. शनिवारी एका प्रचारसभेत बोलताना कंगनानं केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली. त्यानंतर त्यांनी तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं. तेजस्वी सूर्या मासळी खात असल्याचं सांगितलं. तेजस्वी सूर्या भाजपचे नेते आहेत. ते कर्नाटकमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
मंडीमध्ये येणाऱ्या सरकाघाट विधानसभा क्षेत्रात प्रचार करत असताना कंगनानं जनसभेला संबोधित केलं. ‘त्यांना स्वत:लाच माहीत नाही ते कुठे येताहेत, कुठे जाताहेत. अशा प्रकारे बिघडलेल्या शहजाद्यांचा एक पक्ष आहे. मग ते राहुल गांधी असोत, ज्यांना चंद्रावर बटाट्याचं पीक घ्यायचंय किंवा मग तेजस्वी सूर्या असोत, जे गुंडगिरी करतात. मासे दाखवून दाखवून खातात,’ असं कंगना म्हणाली.
बोलण्याच्या ओघात स्वपक्षीय नेत्यावर टीका करणाऱ्या कंगनानं पुढे अनेकांना लक्ष्य केलं. ‘अखिलेश यादव काहीतरी नको ते नको ते बोलत असतात. आमच्या इथेही एक शहजादे आहेत. त्यांना भारतात कोणीही ओळखत नाही. त्यांची ओळख केवळ हिमाचल प्रदेशात आहे. आता त्यांनी काही विधानं केली आहेत. ते म्हणतात ही महिला (कंगना) अपवित्र आहे. पण मी तर पद्मश्री पुरस्कार विजेती आहे. पण तरीही ते मला अपवित्र म्हणतात. मला इथून जाण्यास सांगतात. ही बाब चिंताजनक, निंदनीय आहे,’ अशा शब्दांत कंगनानं विरोधकांवर टीका केली.
Related News
ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा; दिल्लीत INDIA आघाडीचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा
INDIA Bloc Protest Against Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञाने...
Continue reading
अभिजीत दिपकेंची CJP निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांसोबतच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात आंदोलन उभं करणाऱ्या **कॉकरोच जनता पार्ट...
Continue reading
तेजप्रताप यादव यांचा खळबळजनक दावा; “डायनामाइट लावून माझी हत्या करतील”, हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचाही आरोप
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद याद...
Continue reading
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी पहिल्या पसंतीवर, राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर; तिसऱ्या स्थानी विजय
‘मूड ऑफ द नेशन’ सर्व्हेत विजय यांना 9.2 टक्के पसंती; अरविंद केजरीवाल, अख...
Continue reading
Kangana Vs Taapsee: ‘स्वस्त कॉपी’वरून पुन्हा वाद; कंगनाचा तापसीवर हल्लाबोल, थेट आई-वडिलांवरही केली टिप्पणी
Kangana Vs Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत आणि ...
Continue reading
Vinod Tawde : बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात ‘खेला होबे’; विनोद तावडे यांच्यासमोर काय आव्हाने असणार? भाजप नेता काय जादू करणार?
बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या संघटनात्मक र...
Continue reading
प्रशांत किशोर Election Result Update : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोरांची दमदार आघाडी; भाजपने विजयासाठी लाडू तयार ठेवले, पण निकालाची उत्सुकता कायम
बांकीपूर पोटनिवडणुक...
Continue reading
बुरख्यातील मुली बाजूला होत्या, आपल्या मुली मात्र…; रुचिता सिंहच्या माफीनाम्यावर कंगना राणौत यांची स्पष्ट भूमिका
मोदींविरोधातील घोषणाबाजी, रुचिता सिंहची माफी आणि कंगना राणौत ...
Continue reading
Supriya Sule : 'हा प्रश्न मला नाही, देवेंद्र फडणवीसांनाच विचारा'; जयंत पाटील यांच्या वर्षा भेटीवर सुप्रिया सुळेंची स्पष्ट भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष...
Continue reading
"सोने घ्या, जे हवे ते घ्या, पण माझ्या पतीला मारू नका..." एक्सप्रेसवेवर महिलेची आर्त हाक; 9 जणांच्या टोळीचा थरार, 3 आरोपी अटकेत
देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असले...
Continue reading
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या संशयावर लोकायुक्तांनी 10 सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. महिला अधिकाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सोन्याचे द...
Continue reading
40 वर्षांची मेहनत फळाला! चंदनाच्या झाडाने दिले तब्बल 28 लाख रुपये
40 वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या चंदनाच्या झाडाने अखेर आपल्या मालकाला असे रिटर्न गिफ्ट दिले ...
Continue reading
कंगनाला राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना लक्ष्य करायचं होतं. त्यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक प्रचारादरम्यान मासे खात असतानाच व्हिडीओ शेअर केला होता. चैत्र नवरात्रीच्या आदल्या दिवशी त्यांनी व्हिडीओ शेअर केला होता. त्यावरुन त्यांच्यावर टीका झाली. पण कंगना बोलण्याच्या ओघात चुकल्या आणि त्यांनी तेजस्वी यादव यांच्या जागी तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं.