[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
दररोज केळी खाल्ल्यास शरीरावर होणारे फायदे

दररोज केळी खाल्ल्यास शरीरावर होणारे फायदे

केळं हे वर्षभर उपलब्ध असलेलं आणि सहज परवडणारं फळ आहे. बहुतांश घरांमध्ये केळी आढळतात, आणि काही लोक तर रोजच त्याचं सेवन करतात. पण दररोज केळी खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? ...

Continue reading

संतोष देशमुख हत्या प्रकरण, पर्यावरण ते पशुसंवर्धन, मंत्री पंकजा मुंडेंचं व्हिजन काय? माझा व्हिजनमध्ये मांडली भूमिका

संतोष देशमुख हत्या प्रकरण, पर्यावरण ते पशुसंवर्धन, मंत्री पंकजा मुंडेंचं व्हिजन काय? माझा व्हिजनमध्ये मांडली भूमिका

Pankaja Munde : एबीपी माझाच्या  'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन'  या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली आहे. . Pankaja Munde :  संतोष देशमुख य...

Continue reading

राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवजयंती दिनी केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यातही आग्र्यातील भव्य स्मारकाची तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले. आता, आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji maharaj) स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता, या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातील ज्या ठिकाणी कैद राहिलेले ती जागा महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेश सरकारकडून अधिग्रहित करणार आहे. या जागेवर शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून आग्र्यातील शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालयही याठिकाणी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालय आग्रा येथील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती जागा-वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहीत करणार आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत. देशभरातली पर्यटकांसाठी प्रेरणास्थान बनेल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ्यासह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते. परंतु आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभुराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली. या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबात मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकांत औत्सुक्य असते. आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत राहीले त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात, मात्र, या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहचत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अशाप्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा केलेला पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे. अशा स्थळासाठी आणि त्या दैदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम रहावा, त्या स्थळांची, त्या वारशांची जतन, सवंर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार ‘लय भारी’

स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (D...

Continue reading

CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र

CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री महोदयांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली. राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील स...

Continue reading

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला खदान पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. वर्कशॉपजवळ घडला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या इतर भागांनाही मार बसला आहे. पत्रकार संघटनेचा संताप या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुका पत्रकार संघटनेने पातूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांची निष्काळजी भूमिका? हल्ल्यानंतर महल्ले यांनी तातडीने खदान पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता. मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला, तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले. पोलिसांच्या या दिरंगाईवर पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निर्भीड पत्रकारितेवर हल्ला? विठ्ठल महल्ले हे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्यायाविरोधात अनेक धाडसी वृत्तांकन केले आहे. त्यांच्या या निर्भीड पत्रकारितेमुळेच हा हल्ला घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास करून कटाचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. पत्रकार संरक्षण कायदा प्रभावी करा! पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर संपूर्ण पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर जीवघेणा हल्ला!

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोज...

Continue reading

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता गावातील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दिनांक १९ मार्च २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले असा परिवार असून, ते माजी सरपंच ...

Continue reading

नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये नागपूरमध्ये झालेल्या राड्याला कोण जबाबदार आहे याविषयी वक्तव्य केले आहे.महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरु...

Continue reading

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: 'दिशाच्या मृत्यूनंतर घाबरलो, पोलिसांनी माझे कपडे काढले आणि...', दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा 'तो' धक्कादायक खुलासा...

Continue reading

आताची मोठी बातमी, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, NIA पथक छत्रपती संभाजीनगरात, अपडेट काय?

आताची मोठी बातमी, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, NIA पथक छत्रपती संभाजीनगरात, अपडेट काय?

NIA team in Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले आहे. त्यातच नागपूरमध्ये हिंसाचार उफळल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मराठवाड्यातील...

Continue reading

शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं

शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं

जळगाव तालुक्यातील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंचाचा निर्घृण खून ! चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले अशी माहिती समोर आली आहे. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच सं...

Continue reading