अकोला : शहरातील अकोट फैल येथील अब्दुल कलाम चौकाजवळील गौसिया मशिदीच्या गल्ली
परिसरात सोमवारी (२१ मे) संध्याकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अवकाळी
पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. मागील काही दिवसांपासून स्थानिक नागरिकांनी
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
नाल्यांच्या सफाईसाठी महापालिकेला वारंवार निवेदने दिली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष
केल्यामुळे आज पावसाचे सांडपाणी थेट घरात शिरले आणि संपूर्ण वस्ती पुरात सापडल्यासारखी अवस्था झाली.
या भागातील नाले चोक असून, गटारातून घाण पाणी थेट घरात शिरल्याने परिसरात भीतीचे
आणि संतापाचे वातावरण आहे. महिलांना आणि लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून,
पाण्यातून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास, दुर्गंधी,
आणि दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आज घरात गटाराचे पाणी शिरलं.
आम्ही कितीवेळा मागणी केली, तरी कोणीच ऐकत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.
नागरिकांनी मागणी केली आहे की, “महापालिकेने त्वरित गटार सफाई करून
नाल्यांचे नियोजन करावे, तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.”
आरोग्य विभागाने आणि आपत्ती व्यवस्थापनाने या परिसरात तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे,
अन्यथा साथीचे आजार आणि जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/barsheetakitil-manguamadhyay-avakali-pavasacha-kahar/