बार्शीटाकळी (अकोला) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी
पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील मांगुळ येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश काकड यांच्यावर तर संकट कोसळलं आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
त्यांनी चार एकर शेतात हळद आणि कांद्याची लागवड केली होती,
मात्र काढणीस तयार असलेलं पीक पावसामुळे अक्षरशः सडून गेलं.
रमेश काकड यांनी कांदा आणि हळद साठवणीसाठी खास व्यवस्था केली होती.
मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे संपूर्ण साठवणूक बिघडली आणि त्यांचे अंदाजे १.५ ते २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, इतकं मोठं नुकसान होऊनही अजूनपर्यंत कृषी विभाग वा तालुका
प्रशासनाकडून कोणीही पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अधिकच नैराश्यात सापडला आहे.
“सरकारने त्वरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून योग्य नुकसानभरपाई द्यावी,”
अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर आश्वासने दिली जात असतानाच,
प्रत्यक्षात अद्यापही पंचनाम्याचे काम सुरू न झाल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/paturamidhye-gavansh-smuggling-ughadkis/