मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सुदैवाने सुषमा अंधारे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुखरूप आहोत, अशी माहिती अंधारेंनी सोशल मीडियावर शेअर केल्याने समर्थकांचा जीव भांड्यात पडला.
सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या आधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने मोठा अनर्थ टळला. सुषमा अंधारे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास बारामतीला रवाना होणार होत्या. महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड येथून निघाल्या होत्या. यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या.
इतक्यात हेलिकॉप्टरला अपघात झाला. हा प्रकार सुषमा अंधारे यांच्या डोळ्यादेखतच झाला. अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले असून सर्वजण सुखरुप आहेत. परंतु हेलिकॉप्टरची दृश्यं धडकी भरवणारी आहेत.
Related News
श्वेता महाले यांनी संजय गायकवाडांना पुन्हा डिवचलं; व्हिडीओ शेअर करत घेतला चिमटा, बुलढाण्यातील राजकीय वाद आणखी वाढला
बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमदारांमधील राज...
Continue reading
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
एकनाथ शिंदेंचा मोबाइल विमानातच राहिला; मध्यरात्री पोलिसांची धावपळ, तासाभरात मिळाला फोन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंद...
Continue reading
शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
विधीमंडळातील संख्याबळाच्या चाचणीवर शिंदे गटाचा भर; ‘विवेकाधिकाराचा...
Continue reading
शिंदेंच्या वकिलाचे दोन मोठे युक्तिवाद; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून स...
Continue reading
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी : उद्धव ठाकरेंना धक्का देणारा शिंदे गटाचा दावा; ‘पक्षप्रमुख’ पदावरून सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्व...
Continue reading
परंड्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेसच्या ...
Continue reading
मुंबईतील मराठा मोर्चापूर्वी संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; ‘सरकारला जी भाषा कळते ती वापरा’
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १९ सप्...
Continue reading
मोठी अपडेट! अखेर ठरलं, ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा?
महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा केवळ एक राजकीय कार्यक्रम न...
Continue reading
Instagram चे नवे फीचर; टॅग केलेले आवडते फोटो आता थेट प्रोफाइल ग्रिडवर दाखवा, जाणून घ्या कसे वापरायचे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्सच...
Continue reading
सीजेपी नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप; सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केंद्र सरकार ...
Continue reading
हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अपघातातून सर्वजण बालंबाल बचावल्याने दिलासा मानला जात आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. आदित्य ठाकरेंनी तत्परतेने फोन केला आणि दहा मिनिटात सर्व यंत्रणा कामाला लावली, असंही त्यांनी सांगितलं.