पावसाळा सुरु झाला आहे हिरवाईने बहरलेली जंगले, वनांमधला रानमेवा,
अनेकविध चविष्ट, आरोग्यदायी, औषधी, गुणकारी रानभाज्यांना बहर आला आहे.
या रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत.
Related News
अत्यंत आवडीने या रानभाज्या बनवून खाल्ल्या जातात.
आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषहारक रानभाज्यांचे अनेक फायदे आहेत.
रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जातात.
या भाज्या अतिशय पौष्टिक असतात. आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात.
यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते.
पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात.
पावसाच्या दिवसात येणाऱ्या काही रानभाज्या पुढील प्रमाणे:
- टाकळा/ तरोटा: टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने
शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.
वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो.
त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात.
लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो.
- तादूंळजा किंवा रानमाठ: जसा चवळी माठ असतो, तशीच ही माठाची भाजी दिसते.
थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात
नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठलाही म्हणतात.
- करटोली: ही एक फळभाजी असून ती पावसाळ्यात उगवते.
करटोली दिसायला कारल्यासारखी आणि कडू असतात.
कारल्याची भाजीसारखीच करटोलीची भाजी केली जाते.
करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व फळे येतात.
डोकेदुखीवर कर्टोली उत्तम औषध आहे.
या भाजीचे मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
- आघाडा: आघाडा रोपवर्गीय रानभाजी आहे. अ जीवनसत्वाने भरपूर अशी ही भाजी आहे.
हाडे बळकट करण्यासाठी आघाडा खावा.
आघाडा रक्तवर्धक आहे, पाचक आहे. मुतखडा, मुळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे.
- मायाळू भाजी: याचे वेल अंगणात, बागेमध्ये व कुंडीमध्ये सुद्धा लावता येतात.
ही कोकणात सर्वत्र आढळते. मायाळू थंड गुणधर्मी असल्याने
पित्तशामक आहे. पचनास हलकी, सांधेदुखीसाठी गुणकारी आहे.
- कुर्डू: कुर्डूची भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला शेताचे बांध, पायवाट, मोकळी व पडीक जमीन,
जंगल अशा ठिकाणी आपोआप रुजते. कुर्डुची रानभाजी कोकणासह
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. माठवर्गीय कुळात मोडणारी ही
अतिशय रुचकर व बहुऔषधी गुणांनी युक्त रानभाजी आहे.
बारीक व तांबूस खोडाला गोलाकार आकाराची पाने येतात.
ही रानभाजी कोवळी असताना खाण्यातच खरी मजा असते.
कुर्डूच्या कोवळ्या पानांचे तुरे भाजीसाठी वापरतात.