ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता असून टॅलेंटच्या बाबतीत ते शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा अजिबात कमी नाहीत, असे प्रतिपादन ठाणेदार अजित जाधव यांनी केले. दारूल उलूम संस्था व इमाम वलीउल्लाह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजतर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या बोर्ड प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आपल्या भाषणात जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणतेही शिखर गाठू शकतात. आजच्या स्पर्धात्मक युगात संधी सर्वांसाठी समान असून, विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
शिक्षण हे समाजबदलाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, नैतिकता आणि कर्तव्यभावना जोपासण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव ठेवून जबाबदार नागरिक बनण्याचा संदेशही त्यांनी दिला.
Related News
मोठी फी, पण ‘पेन’ व ‘अपार’ आयडीच नाही; विद्यार्थिनीच्या प्रवेशावर संकट
MHT CET CAP 2026: मोठा दिलासा! इंजिनिअरिंग व MBA प्रवेश नोंदणीला 16 जुलैपर्यंत मुदतवाढ; जाणून घ्या 5 महत्त्वाचे अपडेट्स
स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजींना पुण्यतिथीनिमित्त संगीतमय आदरांजली
NEET UG 2026 Exam Analysis: 7 मोठी निरीक्षणे! फिजिक्स-केमिस्ट्रीने घाम फोडला, कटऑफ कमी होण्याची ‘मोठी’ शक्यता?
सोनोरीजवळ महामार्गावर भीषण अपघात: टिप्परच्या धडकेत कारचे मोठे नुकसान, 1 चालक जखमी
7,500 शिक्षकांचे मानधन रखडले! बारावी निकालासाठी रात्रंदिवस मेहनत, तरीही महिनाभर प्रतीक्षा
YCMOU Exam 2026: 558 परीक्षा केंद्रांवर AI CCTV ची कडक नजर, संशयास्पद हालचाल होताच त्वरित अलार्म
कल्याणमध्ये कमलादेवी कॉलेजविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन, मूलभूत सुविधांच्या अभावावरून संताप
Emotional Video: शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमधील भावनिक नाते, शाळेतील शेवटचा दिवस पाहून डोळे पाणावतात
पालघर न्यूज : पालघरमधील विद्यार्थ्यांसाठी जपानच्या करिअरच्या संधी खुल्या
श्री शंकर विद्यालय येथे इयत्ता दहावीचा निरोप समारंभ उत्साहात
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद ; अर्थशास्त्र विभागाची जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक भेट
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती रोशन शाह कासमी यांच्या हस्ते ठाणेदार अजित जाधव यांचे शाल व पुष्पमालाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर जाधव यांनी संस्थेची पाहणी करून शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शे. इमरान शेख खालील व मौलवी अशरफ यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद सर्वांनी साजरा केला.
