अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर महापौरपदासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चांमध्ये तथ्यांपेक्षा अफवांना अधिक स्थान दिले जात आहे, हे दुर्दैवी आहे. आज भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट पूर्णतः सामाजिक आणि औपचारिक स्वरूपाची होती. वाढदिवसासारख्या प्रसंगी शुभेच्छा देणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याला राजकीय अर्थ काढणे योग्य नाही.
महापौरपदाबाबत सध्या अनेक नावे चर्चेत आहेत, मात्र कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना काँग्रेसकडून ऑफर असल्याच्या चर्चा माध्यमांतून पसरवल्या जात आहेत, पण त्या संदर्भात अधिकृतरीत्या काहीही ठरलेले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमीच संवाद साधतो, भेटीगाठी होतात, त्यातून लगेचच राजकीय समीकरणे जोडणे हे चुकीचे ठरते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. अकोल्याच्या विकासासाठी सक्षम, स्वच्छ प्रतिमेचा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारा महापौर निवडला गेला पाहिजे. जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखून स्थिर आणि विकासाभिमुख महापालिका चालवणे हेच आमचे प्राधान्य आहे.
Related News
मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून १० प्रवक्त्यांची यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?
राज्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित मोठी बातमी सम...
Continue reading
Sharad Pawar NCP : शिंदे-फडणवीस वादात ‘सुपरबॉस’ कोण? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एका वाक्यात उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज ...
Continue reading
Jayant Patil : “एनडीएकडून कोणतेही निमंत्रण नाही”; भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांनी दिलं स्पष्ट उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयं...
Continue reading
Supriya Sule : 'हा प्रश्न मला नाही, देवेंद्र फडणवीसांनाच विचारा'; जयंत पाटील यांच्या वर्षा भेटीवर सुप्रिया सुळेंची स्पष्ट भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष...
Continue reading
Delimitation Bill : 50 टक्के फॉर्म्युल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा? खासदारांच्या जागांबाबत सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
Delimitation Bill : 50% फॉर्म्युल्याने महाराष्ट्राला ...
Continue reading
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची निष्पक्ष चौकशी करा; गरज पडल्यास SIT स्थापन करा, सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मोठी मागणी
महाराष्ट्र सरकारच्या बहुचर्चित **‘मुख्यमंत्री लाडकी...
Continue reading
Jayant Patil : तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील एकाचवेळी वर्षावर; मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण, राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजका...
Continue reading
Delimitation Bill : डीलिमिटेशन विधेयकावरून महाविकास आघाडीत मतभेद? शरद पवारांच्या भूमिकेनंतर संजय राऊत आक्रमक
ठाकरे गटाचा विधेयकाला विरोध; सुप्रिया सुळे यांच्या वक्...
Continue reading
अमोल कोल्हेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण, मात्र शरद पवारांवरील निष्ठाही केली स्पष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराच्या चर्चांन...
Continue reading
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत केलेल्या आत्मीय वागणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाय...
Continue reading
भाजपनंतर शरद पवारांच्या NCP कडूनही घोडबंदर रोडच्या नामांतराची मागणी; कारण ऐकून अनेकांना वाटेल योग्य, 16 महिन्यांत 27 मृत्यूंचा मुद्दा चर्चेत
मुंबई आणि ठाणे शहरांना जोडणारा अत्यंत ...
Continue reading
पंढरपूर : गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे आंदोलन स्थगित; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगि...
Continue reading
आम्ही कोणत्याही प्रकारच्या फोडाफोडीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि तो निर्णय अकोल्याच्या हिताचा असेल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांवर जनतेने संयम ठेवावा. लवकरच महापौरपदाबाबत सकारात्मक आणि “गोड” बातमी अकोल्याला नक्कीच कळेल, एवढेच मी सांगू इच्छितो.
read also : https://ajinkyabharat.com/shri-jageshwar-vidyalaya-completed-various-cultural-programs/