तेल्हारा (दि.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 2101
रक्तदात्यांचा शिवसंकल्प अभियान राबविण्यात आले. मात्र, शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा
संकल्प पार करत 2169 रक्तदात्यांनी रक्तदान करून अभूतपूर्व इतिहास घडविला.
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
20 जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानात शहर आणि ग्रामीण भागातील विविध संस्था,
संघटना, सरकारी व निमशासकीय कर्मचारी, पोलिस अधिकारी, शिक्षक, व्यापारी, विविध सामाजिक व
धार्मिक समूहांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जात-पात,
धर्माच्या पलीकडे जाऊन रक्तदानाचा हा महत्त्वाचा उपक्रम यशस्वी झाला.
शिवसंकल्पचा ऐतिहासिक प्रवास:
- 2023: 1001 रक्तदाते
- 2024: 1503 रक्तदाते
- 2025: 2169 रक्तदाते
रक्तसंकलन अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला ब्लड बँक,
साई जीवन रक्तपेढी, ठाकरे रक्तपेढी आणि हेडगेवार रक्तपेढी येथे करण्यात आले, ज्यामुळे गरजू रुग्णांना तत्काळ मदत मिळत आहे.
शिवप्रेमींच्या रक्तदान मोहिमेने समाजसेवेचा नवा आदर्श
शिवप्रेमींच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाने रक्तदान चळवळीला नवी दिशा दिली आहे.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या विचाराने प्रेरित होऊन, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
शिवसंकल्प अभियानाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, समाजसेवा हीच खरी शिवसेवा आहे!
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/bhujbancha-tola-tevha-shinde-juniyar-was-four-chief-minister-badalle-pan-then-there-is-a-suit/