डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ संपन्नराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे कृषी पदवीधरांना मार्गदर्शन
अकोला, दि. ५ – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
या समारंभात ४,०४० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
Related News
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण,
तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य
आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, “ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी नव्या पदवीधरांनी
जबाबदारी घेतली पाहिजे.” त्यांनी विद्यापीठाच्या बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कृषी मंत्री कोकाटे यांनी ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाच्या शेतीतील महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की, ”
उत्पादनखर्च कमी करत उत्पन्न वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.”
यावेळी अशोक दलवाई यांनी कृषी संशोधनाची दिशा पर्यावरण संवर्धक असावी,
असे मत व्यक्त करत शाश्वत विकासासाठी जैवविविधता जतन, मृद व जलसंवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली.
या कार्यक्रमात कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकीसह विविध शाखांमधील २५ विद्यार्थ्यांना पीएच.डी.
पदवी प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
READ MORE : https://ajinkyabharat.com/ya-deshchaya-netyavar-trump-yancha/