वॉशिंग्टन/फ्लोरिडा –
जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अमेजॉनने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘कुइपर प्रोजेक्ट’अंतर्गत
पहिल्या 27 उपग्रहांचा यशस्वी प्रक्षेपण केला आहे.
Related News
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे 4:31 वाजता फ्लोरिडामधील केप केनावेरल स्पेस
फोर्स स्टेशन येथून हे उपग्रह एटलस-5 रॉकेटद्वारे अवकाशात पाठवण्यात आले.
उद्दिष्ट – दुर्गम भागात इंटरनेट
‘कुइपर प्रोजेक्ट’ अंतर्गत अमेझॉन पृथ्वीच्या निचल्या कक्षेत (LEO) एक उपग्रह नेटवर्क तयार करत आहे,
जे सुमारे 450 किमी उंचीवरून पृथ्वीवर थेट इंटरनेट बीम करणार आहे.
यामध्ये दुर्गम व इंटरनेटपासून वंचित भागांपर्यंत सुलभ कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
स्टारलिंकला स्पर्धा
या प्रकल्पाअंतर्गत अमेझॉनला 2026 च्या जुलैपर्यंत एकूण 3,236 पैकी 1,618 उपग्रह प्रक्षेपित करायचे आहेत.
यासाठी 80 हून अधिक प्रक्षेपणांचे आरक्षण करण्यात आले आहे, ज्यात स्पेसएक्स,
एरियनस्पेस आणि ब्लू ओरिजिनसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
हे उपग्रह नेटवर्क एलन मस्कच्या स्टारलिंकला थेट स्पर्धा देईल, ज्यांचे 8,000 पेक्षा अधिक उपग्रह आधीच कार्यरत आहेत.
१० अब्ज डॉलर्सचा भव्य गुंतवणूक प्रकल्प
अमेझॉन या प्रकल्पात सुमारे १० अब्ज डॉलर्स (८५० अब्ज रुपये) गुंतवत आहे. कंपनीचे CEO अँडी जेसी यांनी सांगितले की,
“प्रारंभी मोठा खर्च होईल, पण भविष्यात यावरून चांगला नफा आणि गुंतवणुकीवर उच्च परतावा मिळेल.”
सेवा लवकरच सुरू
अमेझॉनने या वर्षाअखेरीस ग्राहक, व्यापारी आणि शासकीय संस्थांकरिता इंटरनेट सेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
‘कुइपर प्रोजेक्ट’मुळे जागतिक पातळीवर इंटरनेट क्षेत्रात एक नवा युग सुरू होण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/majha-mulga-tumchaya-manoranjnasathi-naahi/