मुंबई – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आणि क्रीडा प्रसारक संजना गणेशनने
त्यांच्या मुलावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सला चोख उत्तर दिले आहे. आयपीएल 2025 मध्ये लखनऊ
सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतर त्यांच्या मुलगा अंगदचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
यावर काही नेटिझन्सनी अंगदची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, ज्यावर संजना संतापली.
संजनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी नाही.
जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतो.
इंटरनेट किती घृणास्पद ठिकाण आहे, याची आम्हाला जाणीव आहे.”
तिने पुढे लिहिले, “आम्ही फक्त जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये होतो, दुसरे काही नाही.“
संजनाने काही ट्रोलर्सने अंगदसंदर्भात “नैराश्य” आणि “आघात” यांसारख्या गंभीर शब्दांचा वापर केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
“एवढ्या लहान मुलाबद्दल असे शब्द वापरणे आपल्या समाजाचे दुर्दैवी प्रतिबिंब आहे,” असेही तिने ठामपणे म्हटले.
शेवटी, संजनाने स्पष्ट संदेश दिला, “तुम्हाला आमच्या आयुष्याबद्दल काही माहिती नाही.
कृपया तुमचे मत तुमच्यापुरते मर्यादित ठेवा.“
Read Also : https://ajinkyabharat.com/afridicha-betal-charge/