काटेपुर्णा व कारंजा सोहळा अभयारण्यातील कुरणांचा शास्त्रोक्त पद्धतीने विकास व प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने वनमजूर आणि वनरक्षकांचा दोन दिवसीय अभ्यास दौरा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नरनाळा व धारगड परिसरात 2 व 3 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात कुरण विकासाच्या आधुनिक पद्धती तसेच वन्यजीव संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
नरनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश नंदेश्वर यांनी कुरणांचा दर्जेदार विकास झाल्यास तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढते तसेच त्यातून मांसभक्षी प्राण्यांचे संवर्धन आणि वनपर्यटनाला चालना मिळते असे सांगितले. प्रमोद खांडवये यांनी नरनाळा किल्ला परिसरातील कुरण विकासाची माहिती दिली. धारगड येथे वनरक्षक नितीन सावंत यांनी खाद्य गवताची लागवड बी संकलन गवताचे थोंब लावणे गवत प्लॉट तयार करणे तसेच अखाद्य वनस्पतींचे निर्मूलन याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
या अभ्यास दौऱ्याचे आयोजन विभागीय वनाधिकारी यशवंत नागुलवार सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक अमोल सावंत यांच्या पुढाकाराने करण्यात आले. दौऱ्याचे नेतृत्व वनरक्षक अमोल पोटे प्रवीण देविदास कांबळे आणि ज्ञानेश्वर मारोती सुरणे यांनी केले.
read also : https://ajinkyabharat.com/musical-tribute-to-late-ramakrishna-kolhale-guruji-on-his-death-anniversary/
