अकोट – दिनांक ०७.१२.२०२५ रोजी अकोट पोलीस स्टेशनवर रात्री अंदाजे ९ वाजताच्या सुमारास पवन लक्ष्मण इंगळे (वय २७, रा. महेश कॉलनी, अकोट, जि. अकोला) आले आणि त्यांनी पोलीसांना माहिती दिली की, त्यांच्या घरात राहणाऱ्या महिनेल (नाव जाहीर नाही) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या तक्रारीवरून पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. अमोल माळवे, पोलीस उपनिरीक्षक श्री. निलेश बारहाते, एएसआय श्री. अनिल वक्टे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ पोहोचले. त्यांनी पंचनामा केला व मृतक महिनेल यांचा प्रेत ग्रामीण रूग्णालय अकोट येथे पीएमसाठी ठेवला. या प्रकरणी मर्ग क्रमांक ३४/२५ कलम १९४ बी.एन.एस.एस. नुसार दाखल केला गेला.
दुसऱ्या दिवशी, दिनांक ०८.१२.२०२५ रोजी तपासादरम्यान पोलीसांनी पवन इंगळे याचा बारकाईने विचारपूस केली. तपासात असे निष्पन्न झाले की, सदर प्रकरण संशयास्पद आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त पीएम रिपोर्टमध्ये मृतकाचा गळा आवळल्याने मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. यावरून पवन इंगळे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी मृतकाचे गळा आवळून खून केले असल्याची कबुली दिली.
यावरून, मृतकाचे भावाचे बयाणावरून अप.नं. ४८४/२५ कलम १०३ (१) भारतीय दंड संहितेप्रमाणे प्रकरण दाखल केले गेले व आरोपी पवन इंगळे यास अटक करण्यात आली आहे. या कामगिरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
Related News
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
8 महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून बेपत्ता; नाशिकमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसो...
Continue reading
पतीकडून संशय अन् सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणातील FIR मधून धक्कादायक खुलासे
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुजावर रा...
Continue reading
मुलाच्या तोंडात चॉकलेट असतानाच कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी घेतला धक्कादायक निर्णय; नळदुर्ग किल्ला प्रकरणात नवे खुलासे
नळदुर्ग : राष्ट्रीय दर्जाची कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्य...
Continue reading
महाराष्ट्राची ‘वाघीण’ कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात नळदुर्ग किल्ल्यातील रजिस्टर नोंदीने खळबळ; ‘पती पाठीमागून येत आहेत’ सांगून किल्ल्यात प्रवेश
महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात आपल...
Continue reading
राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन लेकरांसह किल्ल्यावरून उडी; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
नळदुर्ग किल्ल्यात हृदयद्रावक घटना; अश्विनी पौळ, मुलगा अजिंक्य आणि मुलगी क्रा...
Continue reading
अंकित बलियान हत्या: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकल्यानंतर दोन तासांत हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यु...
Continue reading
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; संचालकासह ५ जण ताब्यात, आणखी आरोपींची शक्यता
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने आता गंभीर ...
Continue reading
पाय बांधले, डोक्यावर वार; NEET विद्यार्थिनीच्या हत्येने वाराणसी हादरलं, पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि ...
Continue reading
बांगलादेशातील हिंदू कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; बंद घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्य संशयास्पद परिस्थितीत मृत आढळल्यान...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर : उरलं फक्त भयाण घर, आणि सतत भुंकणारा कुत्रा…
छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगर परिसरातील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एकाच...
Continue reading
Khavdya Dongar Case: आधीच एक मुलगा गमावला, आता कुणाल…; चांदगुडे कुटुंबाबाबत मोठी माहिती समोर
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर घडलेल्या धक्क...
Continue reading
पोलीस निरीक्षक श्री. अमोल माळवे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, एएसआय अनिल वक्टे, पोहेकॉ नंदकिशोर कुलट, नापोका विपुल सोळंके, पोकॉ विशाल दारोकार, चालक पोकॉ संदीप तायडे, सुरेश माकोडे यांनी तपास व घटनास्थळावर कामगिरी केली.
या घटनेने अकोट परिसरात मोठा खळबळ उडाली असून, पोलीसांच्या तत्परतेमुळे खूनाचा बनाव उघड झाला. पोलीसांनी सविस्तर तपास सुरू केला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मुख्य मुद्दे:
मृतकाचा गळा आवळून खून; सुरुवातीला आत्महत्या दाखवण्याचा बनाव
आरोपी पवन लक्ष्मण इंगळे यास अटक
मर्ग क्रमांक ३४/२५ व अप.नं. ४८४/२५ कलम १९४ बी.एन.एस.एस. व १०३ (१) आईपीसी नुसार दाखल
तपास पोलीस टीम व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण
read also : https://ajinkyabharat.com/akotchaya-vidyanchal-the-schools-tremendous-victory-in-volleyball/