दि. ६ जून २०२५
पातूर : अकोला – वाशिम महामार्गावर पातूर पासून वाशिमकडे सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या
माळराजुरा फाट्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळाला.
गुरुवार दि. ५ जूनच्या मध्यरात्री सुमारे १:३० वाजताच्या सुमारास पातूर पासून १० किलोमीटरवर
Related News
असलेल्या माळराजुरा फाट्यानजीक कोंबड्यांचा चारा घेऊन जात असलेल्या एका धावत्या ट्रकला अचानक आग
लागल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात येताच ट्रकचालकाने सावधानता बाळगून महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस
रोडवर ट्रक थांबवला मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.यावेळी त्या मार्गाने प्रवास करीत असलेले
पत्रकार सैय्यद साजीद हुसेन यांना हा प्रकार दिसल्याने त्यांनी पातूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाशी संपर्क केला
असता अवघ्या काही वेळातच अग्निशामक दलाचे चालक सैय्यद अश्फाक व प्रल्हाद वानखडे यांनी
घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली,मात्र या
आगीत ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला असून ट्रकला आग लागल्याचे चालकाच्या वेळीच लक्षात
आल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या
असता पातूर पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत केली.दरम्यान आगीचे नेमके कारण कळू शकले
नसून पातूर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
