पाकिस्तानचा मोठा फज्जा! भारतात नसलेल्या ‘2 हवाई तळांवर’ हल्ल्याचा दावा; सोशल मीडियावर उडाली खिल्ली
इस्लामाबाद : भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून अनेक दावे करण्यात आले. मात्र त्यातील एका दाव्याने आता पाकिस्तानची मोठी फजिती झाली आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूज वाहिनीवर दाखवण्यात आलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी भारतातील दोन कथित हवाई तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी ज्या ठिकाणांचा उल्लेख केला, त्या नावाचे कोणतेही सक्रिय हवाई तळ भारतात अस्तित्वातच नाहीत.
यामुळे पाकिस्तानच्या सैन्याच्या दाव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून सोशल मीडियावर या प्रकाराची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जात आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या दाव्याला “फेक टार्गेट प्रोपगंडा” असे संबोधले आहे.
Related News
Pakistanच्या कोहाटमध्ये मशिदीजवळ भीषण स्फोट; 16 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
शुक्रवारच्या नमाजवेळी स्फोटाने खळबळ; पोलिस लाईन्स परिसरात गोळीबार, बचावकार्य सुरू
Pakistan : Pakis...
Continue reading
लादेनला कुणी लपवले होते, हे जगाने लक्षात ठेवावे; भारताचा UNSC मध्ये पाकिस्तानवर निशाणा
9/11 हल्ल्याच्या सूत्रधारांचा दाखला देत भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनेनी यांचा सवाल; ...
Continue reading
भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतेची पाकिस्तानकडून कबुली; वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचे महत्त्वाचे वक्तव्य
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्ण राहिले आहेत. दो...
Continue reading
हुतींचा मोठा दावा; सौदीचे F-15 फायटर जेट पाडल्याचा दावा, स्थानिक मिसाईलच्या वापराची चर्चा
येमेनच्या मारिबमध्ये कारवाई केल्याचा हुतींचा दावा; सौदीकडून अद्याप अधिकृत दुजोरा नाही
ये...
Continue reading
Mecca Pact : सौदी अरेबियावर हूतींचे हल्ले; पाकिस्तानकडून थेट लष्करी कारवाईला तूर्तास नकार, इस्रायलकडे मदतीसाठी धाव
Mecca Pact : मध्य पूर्वेतील संघर्ष दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा ...
Continue reading
येमेनमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका; हुती-सौदी समर्थित सैन्यात जोरदार चकमकी, ड्रोन-मिसाईल हल्ल्यांचे दावे
येमेन : येमेनमध्ये हुती बंडखोर आणि सौदी अरेबियाच्या समर्थनातील सैन्यांमधील स...
Continue reading
S-400 नंतर आता Su-57Eची तयारी? पुतिन भारताला देणार अत्याधुनिक शस्त्रांची ऑफर!
पुतिन- मोदी भेटीत मोठा निर्णय? S-400 पासून Su-57E पर्यंत 4 शस्त्रांवर होणार चर्चा! : भारत आणि रशिया ...
Continue reading
श्रीलंकेचा भारताला मोठा शब्द; भारतविरोधी कारवायांसाठी श्रीलंकन भूमीचा वापर होऊ देणार नाही
India-Srilanka Relations : भारत आणि श्रीलंकेमधील द्विपक्षीय संबंधांना सध्या आणखी बळ मिळता...
Continue reading
Pakistan सौदीच्या मदतीला युद्धात उतरणार? मक्का करारामुळे मध्यपूर्वेत नवा तणाव
Pakistan Mecca Pact : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सौदी अरेबियाच्या सुरक्षेबा...
Continue reading
पाकिस्तानमध्ये मोठा दुहेरी हल्ला; २५ सैनिक ठार झाल्याचा BLAचा दावा, हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली
बलुचिस्तानमध्ये जियारत क्रॉस आणि सुराब येथे हल्ले; पाकिस्तानी सुरक्षा दलांची शस्...
Continue reading
पाकिस्तानचा पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर आक्रोश; शहबाज शरीफांनी SCO मध्ये उठवला सिंधू जल कराराचा मुद्दा, भारताच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष
भारताने सिंधू जल करार स्थगित के...
Continue reading
भारत-बांगलादेश संबंधांवर पुन्हा तणावाचे सावट; पाकिस्तानच्या जवळिकीमुळे ढाक्याच्या हालचालींकडे भारताचे लक्ष
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध गेल्या काही काळापासू...
Continue reading
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पाकिस्तानच्या प्रसिद्ध जिओ न्यूज वाहिनीवर नुकतीच ‘ऑपरेशन बुनयान अल-मरसूस’ संदर्भातील विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीमध्ये फतह-1 क्षेपणास्त्र डागणाऱ्या पथकातील काही अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला होता.
या मुलाखतीत अँकरने पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की, “फतह-1 क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला का?” यावर कॅप्टन मुनीब जमाल यांनी आत्मविश्वासाने उत्तर देत सांगितले की, “आम्हाला दोन लक्ष्य देण्यात आली होती आणि आम्ही दोन्ही ठिकाणी अचूक हल्ला करण्यात यशस्वी ठरलो.”
त्यांनी पुढे सांगितले की, “राजौरी आणि मामून हवाई तळांवर आम्ही अचूक निशाणा साधला.”
पण यानंतरच संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
भारतात आहेत का हे हवाई तळ?
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ज्या दोन हवाई तळांचा उल्लेख केला, त्यांची पडताळणी सोशल मीडियावरील युजर्स आणि संरक्षण तज्ज्ञांनी सुरू केली. त्यानंतर उघड झाले की, भारतात “राजौरी एअरबेस” किंवा “मामून एअरबेस” नावाचे कोणतेही सक्रिय भारतीय हवाई दलाचे तळ अस्तित्वात नाहीत.
राजौरी म्हणजे काय?
राजौरी हे जम्मू-काश्मीरमधील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय आहे. नियंत्रण रेषेजवळ असल्यामुळे या भागात भारतीय लष्कराच्या काही तुकड्या तैनात असतात. मात्र तिथे भारतीय हवाई दलाचा कोणताही अधिकृत किंवा सक्रिय एअरबेस नाही.
राजौरीचा उल्लेख “हवाई तळ” म्हणून केल्याने पाकिस्तानच्या माहिती व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.